धुळे-सोलापूर महामार्गाच्या कामाबाबत दिले निवेदन

रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे निर्देश देऊ-गडकरींचे आश्वासन

बीड । वार्ताहर

बीड शहरासह मतदारसंघातील जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची पुर्तता करण्याबाबतची धडपड आ.संदीप क्षीरसागर करत असल्याचे दिसून येत आहे. काल विविध प्रश्नांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची भेट घेऊन मतदार संघातल्या अडीअडचणी सांगितल्यानंतर शहरातून जाणार्या धुळे-सोलापूर रस्त्याच्या प्रश्नी केंद्रीय रस्ते, बांधकाम व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची खा.पवारांनी भेट घडवून आणली तेव्हा आ.संदिप क्षीरसागर यांनी बीड शहरातील कोल्हारवाडी-बार्शी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक-जिरेवाडी 12 कि.मी.रस्ता व बाह्यवळण रस्त्याला सर्व्हिस रोड तातडीने करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी गडकरी यांनी सविस्तर चर्चा करत सदरचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन देत संबंधितांना तात्काळ निर्देश दिले. गेल्या अनेक वर्षापासून रखडत पडलेला बीड शहरातील रस्त्याच्या प्रश्नासह बाह्यवळण रस्त्याला सर्व्हिस रोड व स्लिप रोडचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
बीड शहरालगत बायपास झाल्यानंतर शहरातून जाणार्या 12 कि.मी. रस्त्याचे काम मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित होते. आ.संदीप क्षीरसागर यांनी जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची जाण ठेवत ते कामे प्रगतीपथावर जावेत म्हणून पाठपुरावा करत असल्याने शहरासह मतदार-संघातील कामे जलदगतीने होत आहेत. आ.संदिप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची भेट घेऊन मतदार-संघातल्या अडीअडचणी सांगितल्या त्याचबरोबर बीड शहरातून जाणार्या धुळे-सोलापूर महामार्गावरील जीरेवाडी, जालना रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कोल्हारवाडी या 12 कि.मी.च्या रस्त्याचे काम, रस्ता सुधारणा, सुशोभीकरण, नुतनीकरण, स्लिप रोड, सर्व्हिस रोडचे अद्याप काम झालेले नाही. याबाबत खा.शरदचंद्रजी पवारांनी आ.संदीप क्षीरसागर यांची थेट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घडवून आणली. आ.क्षीरसागरांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याबाबत सविस्तर निवेदन दिले. यावेळी गडकरी यांनीही विकास कामे जलदगतीने व्हावेत, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सदरचे काम हे लवकरात लवकर तातडीने मार्गी लावण्याबाबतचे निर्देश देऊ असे आश्वासन दिले. आ.संदिप क्षीरसागर यांनी सदरच्या प्रश्नाचा पाठपुरावा करत राहिल्यामुळे येत्या काही दिवसात जिरेवाडी ते कोल्हारवाडी या शहरातून जाणार्या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. आ.क्षीरसागर विकास कामासाठी धडपडत असून जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची पुर्तता करण्यासाठी ते सातत्याने वरिष्ठ मंत्र्यांच्या संपर्कात राहतांना दिसून येत आहेत.

खा.शरद पवारांसोबत आ.संदिप

क्षीरसागरांचा दिल्ली-मुंबई विमान प्रवास

बीड विधानसभा क्षेत्रातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गातंर्गत बीड शहरातील 12 कि.मी.चा रस्ता, बाह्यवळण रस्त्यांतर्गत स्लिप सर्व्हिस रोडसह आदी प्रश्न घेवून आ.संदिप क्षीरसागर दिल्ली दरबारी पोहचले. बीड मतदार संघातील सर्व प्रश्न केंद्राशी निगडीत असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या कानी टाकत खा. पवार यांनी बीड शहरातील 12 कि.मी.च्या रस्त्याच्या प्रश्नासह बाह्यवळण रस्त्याला स्लिप सर्व्हिस रोडचा प्रश्न घेवून सदरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घडून आणली. बैठक संपली आणि पवार यांनी मुंबई ते दिल्ली सोबत जाणार असल्याचे सांगितले.


आ.संदिप क्षीरसागर यांना दिल्ली ते मुंबई विमान प्रवासात आलेला अनुभव काल बीड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी मा.साहेबांची दिल्ली येथे भेट घेतली होती. यानंतर परत मुंबईला येतांना साहेब स्वतःहून मला त्यांच्या सोबत घेऊन आले तो सुवर्णक्षण. या प्रवासात साहेबांचा भौगोलिक अभ्यासाची जाणीव झाली. प्रवासा दरम्यान प्रवासी विमानाचा वेग किती असावा, आत्ता किती आहे तसेच किती उंचीवरून आपण प्रवास करत आहोत याबद्दल साहेबांनी माहिती सांगितली. खाली दिसणारा प्रदेश कोणता आहे, तिथे काय पिकते, तिथले वैशिष्ट्य काय असा सर्वांगीण अभ्यास साहेबांकडे असल्याचे समजले.संपूर्ण प्रवासादरम्यान बराच वेळ साहेब वाचन करत होते. माझ्यासहित आजच्या युवकांनी साहेबांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. प्रवासा दरम्यान आनंदाची बाब अशी कि, साहेबांच्या पत्नी मा.प्रतिभाताई शरदचंद्रजी पवार यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. बालपणापासून साहेबांना कधी टीव्हीवर तर कधी वृत्तपत्रांमध्ये पाहून मी राजकारणात आलो. तेव्हापासून साहेब माझे हिरो आहेत.आज या माझ्या आदरणीय नेतृत्वासोबत दिल्ली ते मुंबई विमानप्रवास करायला मिळाला तो मी माझे भाग्य समजतो असे आ.संदिप क्षीरसागर यांनी फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करून म्हटले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.