शिरूर कासार । वार्ताहर

शहरातील हमरस्ते आपलेच असल्याच्या आविर्भावात वाहन चालक जिथे काम असेल तिथेच कुणाला त्रास होईल याची पर्वा न करता लावत होते.बेशिस्त वाहन चालकाला अखेर शिस्त लावण्यासाठी पोलीसांचा अख्खा फोजफाटा शनीवारी रस्त्यावर उतरला व पोलीस व्हॅन मधील  स्पिकर वरून वाहने आडवे लावु नका असे आवाहन करत होते अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल असेही व ठणकावुन सांगीतले जात होते.
शिरूर शहरात शिस्तिचा बोजबारा उडाला होता. जिथे काम असेल तिथेच कार्यालयासमोर, बँकेच्या दारात ,दुकानासमोर खरेदी होईपर्यंत तर हॉटेलमधे जावुन चहा नाष्टा मोकळ्या मनाने उरकेपर्यंत दुचाकी तसेच चारचाकी वाहन कसेही आडवे तिडवे उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत होते याचा त्रास पायी चालणार्‍या लोकांना होत होता. बोललेच तर अरेरावीची भाषा केली जायची, हा सर्व त्रास निमुटपणे लोकांना सहन करावा लागत असायचा यातुन किरकोळ अपघात देखील होत होते. अखेर या सर्व बाबींची दखल पोलीसांनी घेउन बेसिस्त वाहन व त्याच्या चालकांना सिस्त लावण्याचे ठरवले आणि पो.नि. सिध्दार्थ माने व पोलीस उपनिरीक्षक डॉ .रामचंद्र पवार शनीवारी सकाळपासुन आपली पोलीस फौजदार घेऊन रस्त्यावर उतरले ,गाडीमधील स्पिकर वरून सुचना देत होते.यापुढे रस्त्यावर वाहन उभे केल्यास संबंधीत वाहन धारकांना तसेच दुकानदार व हॉटेल चालक यांचेवर देखिल कारवाई केली जाईल असे सांगत होते.गाड्याच्या या बेस्तिमुळे शहराचे सौंदर्य हारपुन तर जातेच शिवाय छोटे छोटे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा घटना घडु नये यासाठी आपण आज रस्त्यावर उतरलो असल्याचे पो.नि.सिध्दार्थ माने व पोलीस उप निरीक्षक रामचंद्र पवार यांनी सांगितले याउपर शिस्तीचा भंग केल्यास वाहनधारक आणि दुकानदार,हॉटेल चालक यांचेवर कारवाई अटळ असल्याचेही सांगितले.

शहरात पार्किंगचा अभाव

तालुक्याचे ठिकाण असल्याने सतत वर्दळ असतेच परंतू शहरात कुठेही पार्किंगची व्यवस्था आतापर्यंत झाली नाही परिणामी वाहन चालकालाच जागा सोयीची वाटेल तीथे तो आपले वाहन उभे करतो हे देखील सत्य नाकारता येत नाही. नगरपंचायत समोरील चौकाला पार्किंगचे स्वरूप आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.