चौकशी अधिकार्यांचीच चौकशी करा- डॉ.गणेश ढवळे
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील वनविभागातील डीपीटीसीमधून दिलेल्या 10 कोटी 84 लाख रूपयांच्या वनाधिकार्यांनी कागदोपत्रीच केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी औरंगाबाद येथील वनविभागाचे कंद नावाचे चौकशी अधिकारी मंगळवारी (दि.29) बीडमध्ये दाखल झाले खरे,परंतु कोणते काम तपासत आहोत त्या कामाचे कार्यारंभ आदेश अथवा किती निधी खर्च झाला याविषयी कोणतीही माहीती शेवटपर्यंत मिळालीच नाही, त्यामुळेच त्यांनी नेमकी चौकशी कशाची केली असा प्रश्न उपस्थित होत असून ही चौकशी व तपास वांझोटाच ठरल्यात जमा झाला आहे.
मार्च 2020 अखेरीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी डीपीडीसीमधुन वनविभागातील विविध कामांसाठी 10 कोटी 84 लाख रूपये निधी दिला.मात्र काम कागदोपत्रीच दाखवून नातेवाईकांच्या नावावर निधी उचलून हडप केला.यासंबधी शिवशंकर भोसले,डॉ.गणेश ढवळे, गवळी यांनी वरिष्ठांना तक्रार केल्या होत्या. त्यानंतर वरिष्ठांमार्फत चौकशीसाठी श्री.कंद यांचीने नेमणुक करण्यात आली.मंगळवारी हे चौकशी अधिकारी बीड वनविभागात दाखल झाले.त्यांनी कागदपत्राविना चौकशी केल्याने नेमकी कोणती माहिती जाणून घेतली असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान चौकशी समितीसाठी आलेले कंद यांना बीड कार्यालयातच कार्यारंभ आदेश, अंदाजपत्रक व ईतर कागदपत्रे सोबत घेण्याची वारंवार विनंती केल्यानंतर वनपाल कागदपत्रे घेऊन पोहचला असेल असे सांगितले प्रत्यक्षात करचुंडी येथिल वनात गेल्यानंतर कागदपत्रे विसल्याचे सांगितले. यावरून चौकशी अधिकार्याची नियत कळुन चुकली.कार्यारंभ आदेश, कुठलीच कागदपत्रे चौकशी समिती सोबत नव्हती त्यामुळे चौकशी समितीशी सहमत नसुन भविष्यात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवशंकर भोसले यांनी दिला आहे. तर डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे की, राखीव वनविभागात जेसीबी मशिनने काम कसे? कोणी परवानगी दिली? कोरोना कालावधीत मजूर कोठून आणले? परराज्यातील मजूर कसे? मार्च एण्ड मध्ये काम करून उचललेल्या निधीचे काम सध्या कसे? या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर वनाधिकारी मधुकर तेलंग ,वनपाल मोरे यांच्याकडे नव्हते त्यामुळेच कागदपत्रा विना चौकशी वांझोटीच ठरली.
Leave a comment