शेख मंजूर यांच्यावर कारवाई करण्याचा चार वर्षांपूर्वी होता आदेश
माजलगाव । वार्ताहर
माजलगावचे नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी न प निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रासोबत द्यावयाच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्या प्रकरणी रफिक तांबोळी यांनी दिलेल्या तक्रार अर्जावर 4 जानेवारी 2017 रोजी राज्य निवडणूक आयोगाने कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या पत्राला जिल्हा प्रशासना कडून केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप तक्रार कर्ते रफिक तांबोळी यांनी लोकश्नशी बोलताना केला आहे.दरम्यान या विषयी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही
याबाबत राज्य निवडणूक आयोगाने क्रमांक रानीआ/न प 2017/स क 32/का 6, 4 जानेवारी 2017 रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्या नावे शेख मंजूर यांच्यावर दिनांक 11 ऑगस्ट 2005 च्या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार व 20 फेब्रुवारी 2013 च्या परिपत्रकां नुसार शेख मंजूर यांच्यावर योग्य कारवाई करण्याचे यात म्हटले आहे.या पत्रावर राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांची स्वाक्षरी आहे.शेख मंजूर यांनी नप निवडणूक 2016 च्या नामनिर्देशन पत्रासोबत दिलेल्या शपथ पत्रात आपल्या नावावर व आपल्या पत्नीचा नावावर असलेली स्थावर व जगम मालमत्ता लपवून ठेवल्याबाबत रफिक तांबोळी यांनी 28 डिसेंम्बर 2016 रोजी तक्रार दिली असून या गोष्टीस आज चार वर्षे पूर्ण होत आहे मात्र जिल्हा प्रशासनाने यावर काहीच कारवाई अजून पर्यंत केली नसून शेख मंजूर हे नगराध्यक्ष पदावर ही विराजमान झाले आहे.खरे पाहता राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शेख मंजूर यांचे नगरसेवक पद रद्द होहून त्यांना या प्रकरणात शिक्षा होते मात्र तसे न होता जिल्हा प्रशासनच्या आशीर्वादाने शेख मंजूर हे नगराध्यक्ष झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे हात यात ओले झाले की काय अशी शंका व्यक्त होत आहे.
मालमत्तेची माहिती दडवली?
रफिक तांबोळी यांनी दिलेल्या अर्जासोबत शेख मंजूर यांनी कळेगाव थडी, मनूर,भटवडगाव,व माजलगाव न प हद्दीतील अशी एकूण सुमारे 10 ते 12 ठिकाणचे प्लॉट,जमिनीची माहिती लपवून ठेवल्याचे म्हटले आहे या ठिकाणच्या 2017 मधील पिटी आर व सातबारा या अर्जासोबत जोडल्या आहेत.
राष्ट्रवादीकडून सत्तेचा गैरवापर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सत्तेचा गैरवापर करून जिल्हा प्रशासनास आपल्या इशार्यावर नाचवत असून येत्या अधिवेशनात भाजप नेतृत्वाने हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करावा अशी मागणी याचिकाकरते रफिक तांबोळी यांनी शेख मंजूर यांच्या विरोधातील सर्व पुरावे लोकप्रश्नला देत केली आहे.
Leave a comment