तीन तालुक्यात एकही रुग्ण नाही
बीड / प्रतिनिधी
जिल्ह्यात आज गुरुवारी (दि.10) 378 संशयितांची चाचणी करण्यात आली. यातील 351 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 27 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या रुग्णात घट होत आहे. गुरुवारी 27 बाधित रुग्ण निष्पन्न झाले. बाधितांमध्ये अंबाजोगाई 5, आष्टी 4, बीड 9, गेवराई 2, केज 1, माजलगाव 1, परळी 4 व पाटोदा तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे. गुरुवारी शिरुर कासार, वडवणी आणि धारुर या तालुक्यात कोरोना एकही रुग्ण निष्पन्न झाला आहे.
जिल्ह्यात 18 नोव्हेंबरपासून 10 हजार 685 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. गुरुवारी एकाही शिक्षकाचा अहवाल कोरोना बाधित आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात 115 शिक्षकांचे अहवाल कोरोना बाधित निष्पन्न झाले आहेत तर 28 अहवाल प्रलंबित आहेत. आता जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 16 हजार 40 झाली आहे.पैकी 15 हजार 89 जणांनी कोरोनावर मात केली तर 507 जणांचा मृत्यू झाला.
Leave a comment