बीड । वार्ताहर
जिल्ह्यात आज शनिवारी (दि.५) कोरोनाच्या नव्या रुग्णाच्या संख्येत घट झाली. जिल्ह्यात एकूण ८२१ संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली. पैकी ७९३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर केवळ २८ जण कोरोना बाधीत निष्पन्न झाले. दरम्यान शुक्रवारी नवे ४४ रुग्ण आढळून आले होते तर ६३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगााई तालुक्यात ७, बीड तालुक्यातील ८, धारुर तालुक्यात १, गेवराईत १, केजमध्ये ४, माजलगावात ४, परळीत २, वडवणी तालुक्यात १ रुग्णाचा समावेश आहे. आता, जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १५ हजार ८६४ इतका झाला असून १४ हजार ८५८ जणांनी कोरोनावर मात करुन ते कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ४९६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ५१० जण उपचाराखाली आहेत.
दुसरीकडे जिल्ह्यात शिक्षकांच्या आरटीपीआर चाचण्या सुरु आहेत. शनिवारी आणखी १ शिक्षक बाधित निष्पन्न झाले. आतापर्यंत १० हजार ३६७ शिक्षकांचे स्वॅब घेतले गेले असून या पैकी २६५ जणांचा अहवाल अद्याप प्रलंबीत आहे. आतापर्यंत १०६ जण बाधित आढळून आले आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.
Leave a comment