वन विभागाची माहिती; अफवांवर विश्वास ठेवू नका
गेवराई | वार्ताहर
शहरापासून जवळच असलेल्या पालख्या डोंगरात नागरिकांना रविवारी (दि.29) दुपारी पाच वाजता वन्य प्राणी दिसताच शहरात व परिसरात बिबट्या असल्याचा व्हिडिओ सर्वत्र पसरला व भिंतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु हा दिसलेला प्राणी बिबट्या नसुन तडस असल्याचे स्पष्टीकरण वन विभागाने दिले आहे. संबंधित प्राण्याच्या पायाचे ठसे तपासल्यानंतर वनरक्षक गाडेकर यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान नागरिकांनी भिंती न बाळगता आपली व आपल्या कुटुंबायांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या आष्टी तालुक्यात बिबट्याने चांगला धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने तिघावर हल्ला करुन ठार केल्यानंतर आष्टी परिसरात भीतीचे वातावरण पसरले. सध्या हे भिंतीचे वारे बीड जिल्ह्यात सर्वत्र वाहु लागले असून रविवारी गेवराई तालुक्यातील मन्यरवाडी येथील काही तरुण शहराजवळच असलेल्या पालख्या डोंगरावर जात असताना त्यांना लांब डोंगरावर एक बिबट्यासारखा दिसणारा वन्य प्राणी डोंगरावर मुक्त संचार करीत असताना दिसला. त्यांनी त्याचा व्हिडिओ मोबाईलवर काढून तो सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर परिसरात बिबट्या असल्याची एकच खळबळ उडाली. परंतु या विषयी वनरक्षक गाडेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दिसलेला प्राणी बिबट्या नसुन तडस असल्याचे स्पष्टीकरण दिले. संबंधित प्राण्याच्या पायाचे ठसे तपासल्यानंतर वन विभागाने ही माहिती दिली आहे.
Leave a comment