माजलगाव । वार्ताहर
तालुक्यातील सावरगाव परिसरात एका पेट्रोल पपंच्या मागील शेतात शेतकऱ्याने बिबट्या पाहिला असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली असून प्रशासन ही कामाला लागले आहे.मात्र ही अफवा आहे की सत्य हे वनविभागाकडूनच खात्रीशीर रित्या कळेल.त्या शेतातील ठसे वनविभागास पाठवले असल्याचे तहसीलदार सौ वैशाली पाटील यांनी लोकप्रश्नला सांगितले.
सावरगाव येथील श्रीराम नाईकनवरे या शेतकऱ्याने त्याच्या शेतात काम करत असताना आज दुपारी 1 च्या दरम्यान बिबट्याने पाहिले असल्याची वार्ता हा हा करता सर्व तालुक्यात पसरली असून पायतलावडी,सावरगाव,मंगरूळ आदी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.या शेतकऱ्याने ज्या परिसरात बिबट्या पाहिला तेथील पायाच्या ठसचे फोटो काही युवकांनी घेतले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व तालुक्यात ते ठसे पोचले आहे.पोलीस व महसूल प्रशासनाने ही ठसे वन विभागास पाठवले असून वन विभाग याबाबत अधिकृत सांगू शकेल.नागरिक भयभीत असून प्रशासन अजूनही या ठिकाणी पोचले नाही.
बिबट्या नसून कोल्हा
याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना सम्पर्क केला असून वनविभागाकडून खात्रीशीर माहिती मिळेल मात्र पायाचे ठसे बिबट्याचे नसून कोल्ह्या चे असावेत असा अंदाज आहे नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी अफवा पसरवू नये असे पाटील यांनी लोकप्रश्न ला सांगितले
Leave a comment