एस.पी.आर राजा यांचे पाटोदा येथे नागरिकांना आवाहन
पाटोदा । वार्ताहर
कायदेशीर कारवाई मध्ये पोलिसांना नागरिकांनी सहकार्य केल्यास लोकांना खर्या अर्थाने न्याय मिळू शकतो पोलिसांना सहकार्य करण्याची नागरिकांची जबाबदारी आहे.सोबतच नागरिकांनी कोरोना या महामारी संदर्भात गांभीर्याने घेऊन मास्क व योग्य अंतर ठेवण्याचे आवाहन बीड जिल्हा पोलीस प्रमुख आर राजा यांनी पाटोद्यात नागरिकांशी संवाद साधताना केले
पाटोदा येथील पोलिस ठाण्याचे तपासणी काम संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख आर राज हे पाटोद्यात आले असता त्यांनी शुक्रवारी पाटोदा येथील नागरिकांशी पाटोदा पोलीस ठाण्यात एका छोटेखानी कार्यक्रम घेऊन संवाद साधला यावेळी पाटोदा येथील विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच सरपंच पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.प्रारंभी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी पाटोदा येथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी विलास भोसले विजय जोशी महेंद्र गर्जे राजाभाऊ देशमुख आप्पासाहेब राख आदींनी पाटोदा येथील विविध समस्यां मांडल्या. त्यामध्ये पोलीस ठाणे स्वतःची नवीन इमारत पोलिस निवासस्थान वाघापासून संरक्षण शाळेतील मुलींना संरक्षण विविध अशा समस्या पोलीस प्रमुख यांनी जाणून घेतल्या.
एसपी आर.राजा म्हणाले, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचारी हे कमी असतात यामुळे कायदेशीर बाबींमध्ये पोलिसांना लोकांनी सहकार्य करावे.पोलिस ठाणे अंतर्गत आलेली अनेक प्रकरणेपैकी काही प्रकरणे हे खोटी असल्याने पोलिसांना या संदर्भात मोठा ताण पडतो. लोकांनी संविधानाच्या हक्का प्रमाणे स्वतःसाठी ही संविधानाने घालून दिलेले कायद्याअंतर्गत वागण्याचे आवाहन केले.कोरोनापासून स्वतः व स्वतःच्या कुटुंबाचे व समाजाचे संरक्षण करावे. मास्क व योग्य डिस्टन्स ठेवून या रोगापासून संरक्षण करण्याचे आवाहन केले. यावेळी आष्टी विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजय लव्हारे, सहाय्यक निरिक्षक महेश आंधळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment