2021 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात आज सोमवारी (दि.23) कोरोनाचे नवे 58 रुग्ण निष्पन्न झाले असून या सर्वांवर कोव्हीड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होईल असे अंदाज बांधले जात आहेत, मात्र तूर्तास जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रुग्णाची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे.
आज सोमवारी कोरोना चाचणीचे 2079 व्यक्तींचे अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले.यातील तब्बल 2021 संशयितांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून केवळ 58 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.बाधीत रुग्णांमध्ये अंबाजोगाई 14, आष्टी 13, बीड 11, धारूर 4, गेवराई 4, माजलगाव 2, केज 3, परळी 3, शिरूर 1,वडवणी 2 व पाटोदा तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे.
आता बीड जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 हजार 186 झाली असून यापैकी 477 जणांचा मृत्यू झाला तर कालच्या शनिवरपर्यंत 14 हजार 86 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आता जिल्ह्यात 623 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Leave a comment