माजलगाव च्या नगराध्यक्षाचा प्रताप
माजलगाव - उमेशकुमार जेथलिया
माजलगाव चे नूतन नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी माजलगाव कराच्या डोळ्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली शुद्ध धूळफेक सुरू केली असून माजलगाव व 11 गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टर दुरुस्तीची वर्क ऑर्डर च अजून निघाली नाही तर शुद्ध पाणी कसे येणार असा प्रश्न चर्चिला जात आहे.
पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे लिकेज (पाणी गळती)व वॉल काढण्याची,पाणी पुरवठा करण्याची वर्क ऑर्डर सौ सुमनताई मुंडे यांच्याच काळात निघाली असल्याचे आ प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या लेटरपड वर 9 नोव्हेंबर रोजी छापून दिले होते.तरी स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात माहीर असलेल्या राष्ट्रवादी च्या नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी सौ मुंडे यांच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी लिकेज चे काम चालू असताना फिल्टर चे काम चालू असल्याचे सांगत माजलगावकरा च्या डोळ्यात शुद्ध धूळफेक चालवली आहे. वसंतराव देशमुख अंबाजोगाई यांना लिकेज व वॉल दुरुस्ती चे काम सौ सुमनताई मुंडे यांच्या काळात मिळाले असून त्यांनी हे काम कालपासून सुरू केले आहे.याचे श्रेय सौ सुमनताई मुंडे यांचे म्हणजे भाजप चेआहे.राष्ट्रवादी कॉग्रेस चे नगराध्यक्ष आयत्या पिठावर रेघोट्या ओढत असल्याची चर्चा माजलगाव च्या नाक्या नाक्यावर आहे.
केवळ कागदी घोडे नाचवण्यात माहीर असलेल्या नगराध्यक्ष ना लिकेज व पाणी पुरवठा योजनेची वर्क ऑर्डर काढल्यावर फिल्टर दुरुस्ती चे काम कोणी गुत्तेदार करत नसतो हे कोणीतरी सांगावे लागेल.फिल्टर ज्या बाजूला उभे राहून एखादा नट आवळला आणि फोटो काढला म्हणजे फिल्टर दुरुस्ती होत नसते.
Leave a comment