तत्कालीन पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांचा नो मास्क नो व्यवहार उपक्रम राज्यभरात राबवणार
बीड । वार्ताहर
बीडचे माजी पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी अकोला येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नो मास्क नो व्यवहार असा पॅटर्न अकोला शहरात राबवला. यामुळे तेथे कोरोना रोखण्यामध्ये मोठी मदत झाली. आता तोच पॅटर्न राज्यभरात राबवणार असून नो मास्क नो व्यवहार, नो मास्क नो स्वारी, नो मास्क नो मेडीकल, नो मास्क नो किराणा असा पॅटर्न या अंतर्गत राबवणार आहे.
पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून सुरू केलेला ‘नो मास्क नो व्यवहार, हा उपक्रम आता राज्यभरात सुरू होणार आहे. अकोला पोलिसांची या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेऊन नो मास्क नो सवारी, नो मास्क नो बुक, नो मास्क नो मेडिकल, नो मास्क नो किराणा, यांसह नो मास्क नो व्यवहार हा उपक्रम आता राज्यभरात सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.
पेट्रोल पंप, पुस्तक विक्रीची दुकाने, ठोक किराणा बाजार, भाजी बाजार, ऑटो या ठिकाणावर नो मास्क नो पेट्रोल डीझल, नो मास्क नो बुक्स, नो मास्क नो डील, नो मास्क नो सवारी ही मोहीम सुरू केली. विविध संघटनेचा सहभाग तसेच पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीने अल्पावधीतच ही मोहीम राज्य स्तरावर राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेऊन मोहिमेचे कौतुक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट असलेला माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्यमध्ये आता नो मास्क नो व्यवहार, ही मोहीम राबविण्याच्या स्पष्ट सूचना शासनाकडून सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. आता विना मास्क कोणताच व्यवहार होणार नाही. कोणीही व्यापारी किंवा सेवा देणारे किंवा सेवा घेणारी कोणतीच व्यक्ती विना मास्क राहणार नाही. विना मास्कच्या कोणत्याच व्यक्तीसोबत आता कोणताही व्यवहार होणार नाही.
बीड जिल्ह्यात निकृष्ट मास्क, बोगस सॅनिटायझरची खुलेआम विक्री
अन्न आणि औषधी प्रशासन, महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष
संपूर्ण जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती व धास्ती निर्माण झाली आहे. या बाबीचा गैरफायदा उचलत व्यावसायिकांकडून बीड करांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचे समोर आले आहे. ह्यएन-95 रुपये मास्कच्या नावाखाली बोगस मास्कची चढ्या दराने विक्री करून नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच औषधी विक्रेत्या दुकानांबरोबरच जनरल स्टेशनरीच्या दुकानामध्ये बोगस सॅनिटायझरची विक्री खुलेआम केली जात असून अन्न आणि औषधी प्रशासन तसेच महसुल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बीडकरांचे मोठे नुकसान होत आहे.
जून महिन्यापर्यंत शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले. मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांच्या वाढत्या संख्येपाठोपाठ आता पालिका क्षेत्रातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा स्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये धास्ती व भीतीचे वातावरण पसरले आहे. सहाजिकच पर्यायी उपाययोजना करण्यात नागरिकांचा कल दिसून येत आहे. घराबाहेर निघताना तोंडाला मास्क लावणे जिल्हा प्रशासनाने व नप प्रशासनाने अनिवार्य केल्यामुळे नागरिकांचा ओढा उच्च दर्जाचा मास्क खरेदीकडे असल्याचे दिसत आहे. या सर्व बाबींचा गैरफायदा जिल्ह्यासह शहरातील व्यावसायिकांकडून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. शासनाने प्रमाणित केलेल्या एन-95 मास्कनुसार हुबेहुब बनावट मास्कची विक्री करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक केली जात आहे.
जिल्हा व नप प्रशासनाचे दुर्लक्ष का?
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एन-95 च्या नावाखाली बनावट व दर्जाहीन मास्कची खुलेआम चढ्या दराने विक्री केली जात आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना सातत्याने आवाहन करणाजया जिल्हा प्रशासन व नपचे या आर्थिक लुटीकडे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दंडाची रक्कम पथकांच्या खिशात
तोंडाला मास्क किंवा रुमाल न बांधता घराबाहेर निघणार्या वाहनचालकांना दंड ठोठावण्यासाठी पथकांचे गठन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस कर्मचार्यांसह नपच्या आरोग्य निरीक्षकांचाही समावेश होता. या पथकांनी केलेली थातुरमातुर कारवाई वादाच्या भोवर्यात सापडली आहे. कारवाई करताना दंडाची काही रक्कम कर्मचार्यांनी खिशात घातल्याची चर्चा आहे.
Leave a comment