आज रात्री किंवा एक दोन दिवसात याबाबत अधिकृत आदेश निघण्याची शक्यता
बीड । वार्ताहर
कोरोनाचे संक्रमण काही केल्या आटोक्यात येत नाहिये. बाधित आणि मरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. एकुण मृत्यूसंख्या तब्बल 228 झाली आहे . संपूर्ण जिल्ह्यात दररोज होणारे मृत्यू आणि बाधितांची वाढती संख्या धक्कादायक आहे. कोरोनामुळे बीड जिल्ह्यातील स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. दररोज शंभरहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे चाचणीच्या निष्कर्ष अहवालातून स्षप्ट होवू लागले आहे. लॉकडाऊन असताना आणि तो उठवल्यानंतरही रुग्णसंख्या कमी झालेली दिसत नाही.एकीकडे ही स्थिती असताना काही व्यापाऱ्यांकडूनच लाॅकडाउनची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील वाढते कोरोना बाधित रुग्ण पाहता येत्या एक दोन दिवसात पुन्हा लॉक डाऊन होण्याची शक्यता आहे ,मात्र यावेळी लॉक डाऊन ऐवजी जनता कर्फ्यु अस म्हणत प्रशासनाने तयारी सुरू केली आहे,या लॉक डाऊन ला अनेक व्यापाऱ्यांचा शहरात लॉकडाऊन करायचे की नाही, याबद्दल विविध मतप्रवाह आहेत
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख व्यापाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली,कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पुन्हा दहा दिवसाचे लॉक डाऊन करण्याची माहिती देण्यात आली,यावेळी काही व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला .यावेळी होणारे लॉक डाऊन हे जिल्ह्यातील प्रमुख अकरा शहरापूरते मर्यादित असण्याची शक्यता आहे,ग्रामीण भागात लॉक डाऊन असणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे .
गणपतीच्या काळात केलेल्या लॉक डाऊन मुळे रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचे सांगत प्रशासनाने लॉक डाऊन ऐवजी जनता कर्फ्यु लावण्याचे संकेत दिले.मात्र जनता कर्फ्यु लावल्यावर प्रशासनाचे बंधन असणार की नाही,एखाद्या व्यापाऱ्याने दुकान सुरु ठेवल्यास कारवाई होणार का ?लोक घराबाहेर पडू शकणार का?हे प्रश्न अनुत्तरित आहेत .
मात्र आजच्या बैठकीत शहरातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाचा निर्णय मान्य करण्याचे सांगितले आहे त्यानंतर शहरातील लोक प्रतिनिधीशी बोलून पुढचा निर्णय घेऊ असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे त्यामुळे सध्या तरी लॉक डाऊन बाबत कुठलाही निर्णय झालेला नाही येत्या दोन दिवसात लॉक डाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे
Leave a comment