10 तालुक्यातील 17 गावात 4841 जणांची तपासणी

बीड । वार्ताहर

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 4 शहरे व 40 गावांत प्रशासनाकडून व्यापारी व कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट मोहिम सोमवारपासून हाती घेतली गेली. यामध्ये मंगळवारी (दि.15) दुसर्‍या दिवशी मंगळवारी बीड, गेवराई, आष्टी,माजलगाव, अंबाजोगाई, धारुर, वडवणी, शिरुरकासार, केज व पाटेदा या 10 तालुक्यातील 17 गावांमध्ये तब्बल 4 हजार 841 नागरिकांच्या चाचण्या केल्या गेल्या. यात 176  कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली. 
शिरुर तालुक्यातील रायमोहा येथे 695 जणांची चाचणी झाली यामध्ये 51 जण बाधित आढळून आले तर पाटोदा शहरात 509 जणांची चाचणी झाली यात 20 जण बाधित आढळून आले अशी माहिती नायब तहसीलदार टाक यांनी दिली.केज तालुक्यातील मस्साजोगमध्ये 165 जणांची चाचणी झाली 4 रुग्ण सापडले. आष्टी तालुक्यातील दौलावडगावमध्ये 209 जणांच्या चाचणीत 2 तर डोईठाणमध्ये 107 जणांच्या चाचणीत 01 जण बाधित निष्पन्न झाले. बीड तालुक्यातील चौसाळा येथे 312 जणांच्या तपासणीत 14 तर नेकनूर येथे 246 जणांच्या तपासणीत 2 बाधित रुग्ण सापडले. धारुर शहरात मंगळवारी दिवसभरात तब्बल 1045 नागरिकांची तपासणी झाली, या ठिकाणी 28 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले तर वडवणी तालुक्यात 964 जणांची तपासणी झाली. यात 26 बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथे 40 जणांची चाचणी केली, मात्र एकही बाधित रुग्ण सापडला नाही तर याच तालुक्यातील उजनी गावात 94 जणांच्या चाचणीत 1 आणि डिघोळअंबा येथे 34 जणांच्या चाचणीत 1 रुग्ण आढळून आला.माजलगाव तालुक्यातील  गंगामसला येथे 53 चाचण्यांपैकी 1 जण बाधित आढळून आला. गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे 83 जणांची तपासणी झाली यात 2 बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. गढी येथे 70 नागरिकांची अ‍ॅन्टिजेन टेस्ट झाली, यामध्ये 5 बाधित सापडले, तर चकलांबा येथे 98 जणांच्या तपासणीत 16 बाधित रुग्ण निष्पन्न झाले. याशिवाय धोंडराई येथे 117 नागरिक, व्यापार्‍यांची तपासणी करण्यात आली. यात केवळ 2 बाधित रुग्ण निष्पन्न झाले.आज बुधवारी तिसर्‍या दिवशीही अ‍ॅन्टिजेन टेस्ट मोहिम राबवली जाणार आहे.  

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.