रजनी पाटील यांच्याकडे हिमाचल ऐवजी आता जम्मू-काश्मीरची जबाबदारी

नवी दिल्ली

 

काँग्रेस पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्यात आले आहेत. 23 नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर हे बदल कसे असतील याची उत्सुकता होती. गुलाम नबी आझाद, मोतीलाल व्होरा, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी नव्या नेत्यांकडे राज्यांचा प्रभार देण्यात आला आहे. काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेस कार्यकारणीची फेररचना करण्यात आली आहे. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, डॉ. मनमोहन सिंग, ए. के. अँटोनी, अहमद पटेल, आंबिका सोनी, आनंद शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेले बिहारचे नेते तारिक अन्वर यांना महासचिव पद देण्यात आलं असून सोनिया गांधी यांनी मोठी जबाबदारी दिली आहे.

अन्वर यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या वक्तव्यावर नाराज होऊन पक्ष सोडला होता. अन्वर यांना केरळची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर सोनिया गांधींना पत्र लिहून वादळ निर्माण करणारे गुलाम नवी आझाद यांना महासचिव पदावरून हटवण्यात आलं आहे. ते काँग्रेस कार्यकारणीचे सदस्य आणि राज्यसभेत पक्षाचे नेते असतील.

मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून महाराष्ट्राचे प्रभारी पद काढून घेण्यात आले आहे. आता एचके पाटील महाराष्ट्राच्या प्रभारी पदी असणार आहेत.

काॅंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सहाय्य करण्यासाठी सहा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

१. ए के ॲंटोनी
२. अहमद पटेल
३. अंबिका सोनी
४. के सी वेणुगोपाल
५. मुकूल वासनिक
६. रणदीप सिंह सुरजेवाला

 

खरगे यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी

 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी बदलले आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांच्या ऐवजी एचके पाटील आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असतील. खरगे यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी झाली आहे. पण पुन्हा एकदा कर्नाटकच्या व्यक्तीकडे महाराष्ट्र काँग्रेसचा प्रभार कायम राहणार आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना संघटनात्मक पातळीवर कुठली मोठी जबाबदारी मिळते का याची उत्सुकता होती. मात्र, नव्या बदलांमध्ये त्यांचं नाव कुठेही दिसत नाही. राजीव सातव यांच्याकडे महत्त्वाच्या गुजरात राज्याचा प्रभार कायम ठेवण्यात आला आहे. रजनी पाटील यांच्याकडे हिमाचल ऐवजी आता जम्मू-काश्मीरची जबाबदारी असेल. सोनिया गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीची देखील पुनर्रचना केली आहे. या कमिटीत शशी थरूरस मनीष तिवारी यांना स्थान मिळू शकले नाही. महाराष्ट्रातून वर्किंग कमिटीत राजीव सातव, मुकुल वासनिक, रजनी पाटील, अविनाश पांडे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातले हे सगळे याआधीही वर्किंग कमिटीचे सदस्य होते.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.