नवी दिल्ली :

 

शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. मात्र, या आरक्षणाचा आधीच मिळालेला लाभ अबाधित राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे प्रकरण अधिक न्यायाधीशांच्या पीठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारवर टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी तोडगा काढण्याची सरकारची इच्छा असल्याचं म्हटलं.

“मराठा आरक्षणाबाबत लवकरच तोडगा काढण्याची राज्य सरकारची इच्छा असून त्यांनी बैठक बोलावली आहे. त्यावर आता काय निर्णय घेतात पाहूया,” असं शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षां या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, समितीचे सदस्य नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, परिवहनमंत्री अनिल परब, जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

मराठा आंदोलकांसह आज बैठक

देशातील इतर राज्यांच्या व केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक आरक्षणाला स्थगिती न देता खटला सुरू आहे. मग मराठा आरक्षणालाच सर्वोच्च न्यायालय कशी स्थगिती देते याबाबत आश्चर्य व्यक्त करत शुक्रवारी मराठा आंदोलनाशी संबंधितांसह बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत घेतला.

न्यायालयीन लढाईतील रणनीतीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, आरक्षणाच्या बाजूने लढलेली वकील मंडळी, अभ्यासक व जाणकारांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता दूरचित्रसंवाद माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको, कोर्टात जे वकील दिले ते लहान नव्हते, अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते दिल्लीत बोलत होते. 

मराठा आरक्षणप्रकरणात जे वकील दिले ते ख्यातनाम होते. आम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे. मला कोर्टाकडून पुन्हा न्याय मिळेल असं वातावरण हवं, असं शरद पवार म्हणाले.

अन्य राज्यात आरक्षण दिले, तर मग महाराष्ट्राने अपेक्षा केली त्यात मला काही गैर वाटत नाही.विरोधक यात सरकारची कमतरता सांगतात, पण विरोधकांना राजकारण करायचं आहे. विरोधकांनी आंदोलन करुन काही होणार नाही. हा प्रश्न कोर्टातूनच सुटणार आहे. कोर्टाच्या निर्णयावर मी काही बोलू शकत नाही. पण आम्ही पुन्हा एकदा कोर्टात जाणार, असं शरद पवार म्हणाले.

राज्यात सध्या कोरोनाचा धोका वाढत असताना एकीकडे मराठा आरक्षण, कंगना विरुद्ध शिवसेना, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण अशा मुद्दे आता जोर धरत आहेत. मराठा आरक्षणाला कोर्टाकडून स्थगिती मिळाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेचा भडीमार सुरू आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर विरोधकांवर प्रत्युत्तर दिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण. कोर्टाने दिलेल्या स्थगितीनंतर भाजपकडून राज्य सरकारला टार्गेट केलं जात होतं. पण भाजप सरकारनं दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टानं नाकारलं अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपच्या टिकांवर उत्तर दिलं आहे. 'फडणवीसांना प्रश्न सोडवण्यास इंटरेस्ट नाही त्यांना राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे. सुप्रीम कोर्टाने दक्षिणेसाठी एक वेगळा न्याय आणि महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय असं केलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा वाद करण्याची गरज नाही. देशात 60 टक्के आरक्षण दिल्या गेलं आहे. हे आरक्षण टिकेल असें मला वाटतं' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, 'आपण सामंजस्याने निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण करायला नको. तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे. मराठा आरक्षण स्थगितीवर अध्यादेशाचा पर्याय आहे. अध्यादेश काढल्यास आंदोलन होणार नाही. त्यामुळे विरोधकांना राजकारण करायचं आहे. पण आम्हाला न्याय द्यायचा आहे. न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय अशा शब्दात शरद पवारांनी भाजपवर बाण सोडला आहे.

 

कंगना विरुद्ध शिवसेना प्रकरणात काय म्हणाले शरद पवार?

कंगनावरील कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई ही पालिकेने केलेली कारवाई आहे. त्यामुळे त्याचा राज्य सरकारशी संबंध नाही. तर यावषियी शिवसेनेच्या भूमिकेवर मी बोलणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली तर ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांनी लक्ष घालावं. ड्रग्ज निमित्याने चुकीचा व्यवसाय पुढे येत आहे त्यामुळे मुंबई पोलिसांनी जास्त सतर्क राहण्याची गरज आहे असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.