बीड । वार्ताहर
जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून दररोज शंभरहून अधिक रूग्ण आढळू लागले आहेत. गुरूवारी (दि.10) आणखी 110 नवे रूग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 6024 इतकी झाली आहे. गुरूवारी एकूण 750 स्वॅब तपासण्यात आले. त्यातील 640 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 110 रूग्ण बाधीत निष्पन्न झाले असून त्यांच्यावर कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.
बाधीत रूग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 24, बीड तालुक्यात 20, आष्टीमध्ये 2, धारूर तालुक्यात 9, गेवराई तालुक्यात 6, केज तालुक्यात 3, माजलगावमध्ये 14, परळी तालुक्यात 18, पाटोदा तालुक्यात 4, शिरूर कासार शहर व तालुक्यात 5 आणि वडवणी तालुक्यात 5 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनबाधीत रूग्णांची संख्या 6024 झाली असून यापैकी 4215 रूग्ण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत तर 181 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली आहे. सद्यस्थितीत 1628 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
Leave a comment