बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बुधवारी (दि.9) जिल्ह्यात 166 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असतानाच बुधवारी आणखी 7 रूग्णांच्या मृत्यूची नोंदही आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली आहे. त्यामुळे कोरोनाची जिल्ह्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
बीड जिल्ह्यात बुधवारी एकूण 818 स्वॅब तपासण्यात आले. यात 652 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर उर्वरित 166 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक 32 बाधीत रूग्ण माजलगाव तालुक्यातील आहेत. याशिवाय अंबाजोगाई तालुक्यात 28, आष्टी तालुक्यात 23, बीड 21, धारूर 10, गेवराई 7, केज 10, परळी 24, पाटोदा 3, शिरूर 3 आणि वडवणी तालुक्यात 6 रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात आणखी सात रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली
Leave a comment