धोंडराई / वार्ताहर 

धोंडराई महसुल मंडळात सुरवातीपासूनच पावसाने दडी मारलेली आहे अगोदर थोड्याफार पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी पुर्ण केली आहे मात्र आता पावसाने हुलकावणी देल्याने आलेले पीके हे जळु लागले आहेत तर त्याला जिवदान मिळवण्यासाठी जायकवाडी धरणातुन उजव्या कालव्यास सहाशे क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे परंतु महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे व लाइटअभावी  हे पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचण होत होती धोंडराई लाइट आॅफीसच्या लाइट वेळापत्रकात सतत होणाऱ्या बदलांमुळे धोंडराई गावातील शेतकऱ्यांना थ्री फेज लाइट ही रात्रीच्या वेळीच मिळायची सततच्या रात्रीच्या लाइटला कंटाळून सोमवारी रोजी धोंडराई गावातील शेतकरी आक्रमक होत लाइट आॅफीसवर दाखल होऊन सर्व लाइट ही बंद ठेवुन धोंडराई येथील लाइट आॅफीस बंद करण्याचा निर्णय घेताच धोंडराई महावितरण व तेथील प्रभारी कनीष्ठ अभियंत्यांना जाग आली व थ्रीफेज लाइट च्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला परंतु सदरील थ्री फेज लाइट ही आठ तासांची असुन ती सहाच तास करण्यात आली आहे आणि त्यासाठी मात्र कालव्याच्या पाण्याचे कारण दाखविण्यात येत आहे कालव्याला पाणी आल्याने लाइट ही टिकत नसल्याने लाइटचा वेळ हा कमी केलेला असल्याचे कर्मचारी यांच्याकडुन सांगण्यात येत आहे मग कालव्यात पाणी नसल्यावर आठ तासांची लाइट काय कामाची असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.