जायकवाड़ी धरणातून कधीही पाणी सोड़णार ?
गेवराई / अय्युब बागवान
जायकवाड़ी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पड़ला अथवा वरच्या धरणातून पाणी सोडले तर जायकवाड़ी धरणातून दरवाज्या द्वारे कधीही गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचे नियोजन झाले असून औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी तसा आदेश काढून पैठण उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना सुचित केले आहे. असे असले तरी आपल्या गेवराई तहसील प्रशासनाने अद्याप कोणतीच हालचाल सुरु केली नसून गोदाकाठच्या गावांना सतर्क केले नाही त्यामुळे हे प्रशासन इतके बेखबर कसे असा प्रश्न पड़ला आहे.
मराठवाड़यातील एकमेव सर्वात मोठे धरण असलेले
जायकवाड़ी प्रकल्प विभागाचे नाथसागर टुडूंब भरले आहे,या धरणाची पूर्ण संचय पातळी 493.90 मी. आहे.दिनांक 2 स्प्टेम्बर रोजी 2 वाजे पर्यंत या धरणातील पाणी पातळी 463.62 मी. पर्यंत पोहचली आहे.म्हणजे आज धरणात 95 टक्के पाणी साठा झाला आहे.
धरणाच्या संचय क्षमता जवळपास संपली असल्यामुळे मंजूर धरण प्रचलन अराखड्या नुसार धरणामध्ये या पुढे ठराविक पाणीसाठा करता येवू शकतो जर धरणाच्या पानलोट क्षेत्रात जोराचा पाऊस झाला किंवा वरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग झाला तर कोणत्याही क्षणी गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाकडून केली जावू शकते असे आश्याचे पत्र औरंगाबाद जिल्हाधिक्रयानी आपल्या पैठण येथील अधिकाऱ्यांना दिले असून तात्काल गोदाकाठच्या गावांना सतर्क राहन्याच्या सूचना देण्याचे सांगितले आहे.
गेवराई तालुक्यातुंन मोठ्या प्रमाणात गोदाकाठ आहे,गोदावरी पात्रात जास्त पाणी सोडले तर अनेक गावांना पाण्याचा विळखा पडतो अनेक गांव पाण्याखाली जातात हा पुर्विचा अनुभव लक्षात घेता गेवराई प्रशासनाला याचे गाम्भीर्य नसावे,या बाबत प्रभारी तहसीलदार सुहास हजारे यांच्याशी मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाइल व्यस्त ठेवला होता,असो अजुन ही वेळ आहे प्रशासनाने आतातरी सतर्क होऊन गोदाकाठच्या गावाना सूचना देवून सतर्क करावे,गोदावरी पात्रात धरणातून मोठे पाणी सोडले तर आसपास जीवित व वित्त हानी होऊ नये यांची खबरदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे पण तेच प्रशासन गाफिल असल्यामुळे काय होईल हे सांगता येत नाही म्हणून जिल्हाधिकारी यांनी या महत्वाच्या प्रश्नाकड़े लक्ष द्यावे
अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
Leave a comment