परळी, केज,अंबाजोगाई, माजलगावसह आष्टीत तपासणी

 

बीडवार्ताहर

 

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग कमी करण्यासाठी केज, अंबाजोगाई, माजलगाव ,आष्टी आणि परळी या 5 शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांचे, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यांचे कोरोनाचे अ‍ॅन्टिजन तपासणी करण्यासाठी दि.18,19 व 20 ऑगस्ट 2020 रोजी मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या पाचही शहरात एकुण 210 रुग्ण सापडले.

 

केज शहरात दिवसभरात 684 अ‍ॅन्टिजेन टेस्ट झाल्या.पैकी 19 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर उर्वरित रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले. अंबाजोगाई शहरात एकुण 1697 टेस्ट झाल्या.पैकी 37 बाधित तर उर्वरित अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. माजलगावमध्ये दिवसभरात 1425 तपासणी झाल्या .यातील 71 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आष्टी शहरातही दिवसभरात 629 एकुण अ‍ॅन्टिजेन टेस्ट झाल्या. यात 17 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. परळी शहरात दिवसभरात 1321 अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या. यातील 66 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. तर उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले. दिवसभरात या पाच शहरात एकूण 5756 अँटिजेंन टेस्ट झाल्या, यात एकूण 210 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन झाले आहे. दरम्यान आणखी दोन दिवस कोरोनासंबंधी अ‍ॅन्टिजेन टेस्ट केल्या जाणार आहेत.आरोग्य विभागाची टिम यासाठी परिश्रम घेत आहे.

तीन दिवसाचे असे आहे नियोजन

अंबाजोगाई शहरात अडीच हजार व्यापारी,दीड हजार नागरिक अशा चार हजार जणांची तपासणी होणार असून यासाठी 7 तपासणी केंद्र असणार आहेत.परळीत अडीच हजार व्यापारी आणि साडेसातशे नागरिक असे 3 हजार 250 जणांची 4 केंद्रांवरुन तपासणी होईल.आष्टी व्यापारी आणि नागरिकांची 3 केंद्रांवरुन तपासणी होईल तर माजलगावात 1 हजार 250 व्यापारी व 1 हजार नागरिक अशा 2 हजार 250 जणांची 7 केंद्रांवरुन तपासणी होईल. केजमध्ये 1 हजार 700 व्यापारी आणि 240 नागरिक अशा 1 हजार 940 जणांची 4 केंद्रांवरुन तीन दिवसांत तपासणी होईल.
--------

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.