कोरोना आणि पावसाळी वातावरणात सध्या सरकारी नोकऱ्यांचा पाऊसच सुरु आहे. एसबीआय, पोस्ट, पोलिसांनंतर आता बँक ऑफ इंडियात नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. यामध्ये 42020 रुपये एवढे वेतन मिळणार आहे.


बँक ऑफ इंडियाने या भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामधील अटींनुसार अर्ज करता येणार आहे.

या भरतीसाठी 10 वी पास ते पदवीधर अर्ज करू शकणार आहेत.

पदे आणि पगार

अधिकारी दर्जाच्या 14 जागा असून पगार 23700 ते 42020 रुपये दिला जाणार आहे.
क्लार्क दर्जाच्या 14 जागा असून पगार 11765 ते 31540 रुपये एवढा दिला जाणार आहे.

अर्ज कोण करू शकणार...

अधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुणांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विभागाची पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय A, B आणि C कॅटेगरीमध्ये स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे गरजेचे आहे.
क्लार्क पदासाठी अर्ज करणाऱ्यांना 10 वी पास असणे बंधनकारक आहे. तसेच D श्रेणीतील स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे गरजेचे आहे.

वयाची अट

या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. वयाची मोजणी 01.07.2020 च्या आधारे केली जाणार आहे.

शुल्क

या जागांसाठी SC/ST/PWD मधील उमेदवारांना 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर अन्य उमेदवारांकडून 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे करता येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट https://bankofindia.co.in/ वर जाऊन 16 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीखही 16 ऑगस्ट आहे.

SBI Recruitment 2020: भारतीय स्टेट बँकेमध्ये अनेक पदांवर भरती सुरु आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. SBI ने या भरतीची जाहिरातही प्रसिद्ध केली असून सरकारी नोकरी (Sarkari Nokari) मिळविण्यास इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. एसबीआयच्या भरतीची शेवटची तारीख 16 ऑगस्ट आहे. एकूण 3850 जागा भरण्यात येणार आहेत. गुजरात - 750 पदे, कर्नाटक - 750 पदे, मध्यप्रदेश - 296 पदे, छत्तीसगढ़ - 104 पदे, तमिलनाडु - 550 पदे, तेलंगाना - 550 पदे, राजस्थान - 300 पदे, महाराष्ट्र - 517 पदे (मुंबई वगळता) आणि गोवा गोवा - 33 पदे भरण्यात येणार आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.