तीन दिवसात बीड शहरात 354 बाधित
बीड । वार्ताहर
बीड शहरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सलग तीन दिवस व्यापारी, व्यावसायिकांची कोरोनाच्या निश्चित निदानासाठी अॅन्टिजेन टेस्ट घेण्यात आली. 8 ते 10 ऑगस्टदरम्यान घेतलेल्या या चाचणीत सोमवारी 131 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली. दरम्यान या टेस्टमध्ये शनिवारी पहिल्या दिवशी 86, रविवारी 137 तर सोमवारी 131 असे एकुण 354 इतके रुग्ण निष्पन्न झाले असून आता या सर्वांवर बीडमध्ये उपचार सुरु केले गेले आहेत.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारपासून बीड शहरात व्यापरी, व्यावसायिकांच्या अॅन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या. यात सोमवारी (दि.10) दिवसभरात एकुण 2 हजार 665 व्यापारी, व्यावसायिक, कामगार यांची तपासणी केली गेली. यात 131 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना बाधित निष्पन्न झाले. तिसर्या दिवशीही व्यापार्यांनी या चाचणीसाठी चांगला प्रतिसाद दिला.
कोरोची संसर्गसाखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘सुपर स्प्रेडर्स’ना शोधण्यासाठी बीड शहरात अँटीजन चाचणीचा प्रयोग राबविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला. त्यानुसार सोमवारी बलभीम कॉलेजमध्ये 405 इतके स्वॅब तपासले गेले. पैकी 33 बाधित निष्पन झाले. मॉ.वैष्णोदेवी पॅलेस 492 स्वॅब तपासले गेले. पैकी 33 बाधित निष्पन झाले. अशोक नगर जि.प.शाळेत 488 स्वॅब तपासले गेले. यापैकी 18 बाधित निष्पन झाले, तसेच राजस्थानी विद्यालय विप्रनगर येथे 443 स्वॅब तपासले गेले. पैकी 18 बाधित निष्पन झाले.याशिवाय चंपावती विद्यालय बुथ- 1 मध्ये 387 स्वॅब तपासण्यात आले. यात 14 बाधित रुग्ण सापडले, तर चंपावती विद्यालय बुथ क्र. 2 येथे 450 स्वॅब तपासणी झाली. या ठिकाणी 15 व्यक्ती बाधित निष्पन्न झाले आहेत.
बीडमधील या एकुण सहा केंद्रावर दिवसभरात 2 हजार 665 व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले. यातील 131 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर व्यक्तींची तपासणी व निदान झाल्यामुळे इतर लोकांना होणारा प्रसार थांबवण्यात मदत होणार आहे. शहरातील सहा तपासणी केंद्रावर स्वॅब तपासणीकामी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,आरोग्य सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा एकुण 94 कर्मचार्यांनी काम पाहिले अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
Leave a comment