वाळूच्या टिप्परची दुचाकीला धडक

 

अंबाजोगाई । वार्ताहर

 

अंबाजोगाई तालुक्यातील काळवीट तांड्यानजिक झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शनिवारी (दि.8) रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली. परळीकडून वाळू घेऊन अंबाजोगाईच्या दिशेने निघालेल्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. 

नागनाथ महादेव गायके (35), वसंत जनार्दन गायके (वय 45) आणि विठ्ठल मुंजाजी गायके (23) अशी अपघातातील मयत तरुणांची नावे आहेत. हे तिघेजण शनिवारी रात्री दुचाकीवरून (एमएच 13 बीडी 5684) गावाकडे निघाले होते. ते काळवीट तांडा परिसरात आले असता समोरून भरधाव वेगात येणार्‍या वाळूच्या टिपरने (एमएच 25 यु 2444) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत यांनी पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली.लॉकडाऊनमध्येही वाळूची अवैध वाहतूक अव्याहतपणे सुरु आहे. लॉकडाऊन सुरु असतानाही वाळू माफिया मात्र कुठलेही निर्बंध पाळत नसल्याचे आजच्या अपघाताने पुन्हा एकदा उघड झाले आहे. 
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.