नवी दिल्ली :

 केंद्र सरकारने अनलॉक-3 च्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ५ ऑगस्टपासून जिम उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारने नाईट कर्फ्यू देखील काढला आहे. मेट्रो, रेल्वे आणि थिएटरवरील निर्बंध कायम ठेवले आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवून केले जातील असे सरकारने म्हटले आहे. तसेच इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन केले जातील. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह व्यापक चर्चा झाल्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वंदे भारत मिशन अंतर्गत मर्यादित संख्येने आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर शासन निर्णय घेईल. मेट्रो रेल, सिनेमा हॉल, जलतरण तलाव, थिएटर, बार, सभागृह, असेंब्ली हॉल पूर्वीप्रमाणे बंद राहतील. तर कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरू राहील. सरकारने जी काही सूट दिली आहे ती कंटेनमेंट झोनवगळता क्षेत्रासाठी आहे. कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहतील.

 

सरकारने म्हटलं की, नव्या गाईडलाईन्स कंटेनमेंट झोनला वगळून इतर क्षेत्रासाठी आहे. १ ऑगस्टपासून अनलॉक-3 लागू राहिल. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या सूचना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा केल्यानंतर घेण्यात आला आहे.

राज्यातही अनलॉक 3 चे नियम बदलू शकतात

बुधवारी ( 29 जुलै) राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शासकीय कंत्राटदारांना चालू कंत्राटाबाबत अडचणींसंदर्भात उपाययोजना व सहाय्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे 31 जुलैनंतर लॉकडाऊन किती दिवस करावा, याबाबतही चर्चा करण्यात आली. मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. येत्या काही दिवसात आणखी काही गोष्टींना परवानगी देण्याची शक्यता आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.