गेल्या 24 तासांतील बीडची चिंताजनक आकडेवारी

 

नवी दिल्ली 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी कारगिल विजयाच्या 21व्या वर्धापन दिनी शहीद जवानांचे स्मरण केले. तसेच पाकिस्तानवर निशाणा साधत, भारत पाकिस्तानशी मैत्री करण्यास तयार होता, मात्र पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला. पण या युद्धात विजय आपलाच झाला. यावेळी मोदींनी देशातील सध्याची परिस्थिती यावर भाष्य केले, तसेच 10वीच्या परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी यावेळी संवाद साधला.

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना परिस्थितीवरही भाष्य केले. मोदी म्हणाले की, "भारताचा रिकव्हरी रेट हा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. तर मृत्यूदरही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. मात्र असे असले तरी, कोरोनाचा धोका टळलेला नाही आहे. आपल्याला खूप जास्त सावधान रहावे लागणार आहे. कोरोना अजूनही तेवढाच धोकादायक आहे, जेवढा आधी होता. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे". देशात गेल्या 24 तासांत 48 हजार हून अधिक कोरोना रुग्ण सापडले. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 13 लाखांहून अधिक झाली आहे.

बीड जिल्ह्यातील  एकूण रुग्णसंख्या 536

बीड | वार्ताहर

कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान बीड जिल्ह्यातील नागरिकांसमोर निर्माण झाले आहे.शनिवारी (दि.25) सकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण बाधीत रुग्णांची संख्या 511 झाली असताना रात्री आणखी 25 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या वाढून 536 वर पोहचली आहे. बाधीत रुग्णांमध्ये सर्वाधिक 12 रुग्ण परळी तालुक्यात तर बीड व गेवराईत प्रत्येकी 6 रुग्ण निष्पन्न झाले असून घाटेवाडी(ता.पाटोदा) येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.

बीड शहरातील एक 46 वर्षीय पुरुष डॉक्टर, तसेच पंचशील नगर येथील 25 वर्षीय रुग्णालयीन कर्मचारी महिला, आनंदनगर येथील 30 वर्षीय महिला, 2 वर्षीय मुलगा, शिवाजीनगर येथील 35 व 58 वर्षीय पुरुष, परळीच्या गणेशपार येथील 62 वर्षीय पुरुष, पदमावती कॉलनी, नरहरी मंदिराजवळ राहणारे  38 व 34 वर्षीय पुरुष, न्यू पदमावती कॉलनी, संभाजीनगर येथील 40 व 35 वर्षीय महिला, पोलीस कॉलनी, आझाद चौक येथील 42 वर्षीय पुरुष, धर्मापुरी (ता.परळी) येथील 48 वर्षीय महिला, 03, व 08 वर्षीय मुलगी, 30, 46 वर्षीय पुरुष व 4 वर्षीय मुलगा यांचा कोरोना बाधीत रुग्णांमध्ये समावेश आहे.

याशिवाय गेवराई शहरातील बेदरे गल्लीतील 26 वर्षीय पुरुष, संभाजी चौक येथील 32 वर्षीय पुरुष, लाड गल्लीतील 33 वर्षीय पुरुष, गणेश नगर येथील 45 वर्षीय पुरुष, महेश कॉलनीतील रहिवासी व औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला 33 वर्षीय पुरूष आणि सिंदखेड (ता.गेवराई) येथील 21 वर्षीय पुरुष तसेच पाटोदा तालुक्यातील घाटेवाडी येथील 65 वर्षीय व्यक्तीचा बाधीत रुग्णात समावेश आहे.या सर्व रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

,

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.