ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक जाहीर
मुंबई :
11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. आज, 26 जुलैपासून विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहेत. तर 1 ऑगस्टपासून विद्यार्थ्याला 11 वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. राज्यातील मुंबई महानगर, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात 11 वीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मात्र सदर प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना अद्याप पुरेशी जागृती झालेली नसल्याने या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग 1 भरण्याची तारीख पुढे ढकलली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार उद्यापासून अर्जाचा भाग 1 भरायचा होता, मात्र आता हा अर्ज 1 ऑगस्टपासून विद्यार्थी भरणार आहेत.
या ऑनलाईन प्रवेशाबाबत कनिष्ठ महाविद्यालय, मार्गदर्शक केंद्र तसेच माध्यमिक शाळांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत. पण अद्याप विद्यार्थी आणि पालकांना याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा सूचना विभागीय उपसंचांलकना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांना सखोल ऑनलाइन प्रवेशाबाबतची माहिती दिलेल्या अधिकृत ठिकाणी मिळावी यासाठी दक्षता घ्यावी असे संचालकांकडून सांगण्यात आले आहे.
वेळापत्रक
दिनांक 26 जुलै 2020 पासून - 11 वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे. लॉग इन आयडी मिळवून पासवर्ड तयार करणे.
दिनांक 1 ऑगस्ट पासून - दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेल्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून 11 वी प्रवेशसाठीचा अर्ज भाग - 1 भरणे, शुल्क भरून फॉर्म लॉक करणे.
अर्जातील माहिती शाळा, मार्गदर्शन केंद्रवरून प्रमाणित करून घेणे
विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती तपासून/ verify करून अर्ज पूर्णपणे भरणे
10 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग- 2 महाविद्यालय पसंती क्रमांक भरणे
Leave a comment