मुंबईत दिवसभरात 1035 एवढी झाली असून एकूण संख्या 1,02,423 झाली आहे. तर 41 जणांचा मृत्यू
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसात 40 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत राज्यात आज (20 जुलै) दिवसभरात 8 हजार 240 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाख 18 हजार 695 वर पोहचला आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्या कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंतेची बाब आहे
राज्यात दिवसभरात 5 हजार 460 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 75 हजार 29 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 31 हजार 334 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.92 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात दिवसभरात 176 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये फक्त मुंबईतील 41 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.77 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 12 हजार 30 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 16 लाख 667 नमुन्यांपैकी 3 लाख 18 हजार 695 नमुने पॉझिटिव्ह (19.85 टक्के) आले आहेत. राज्यात 7 लाख 65 हजार 781 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 45 हजार 434 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात गेल्या 12 दिवसात किती रुग्ण वाढले?
- 8 जुलै 2020 - 6 हजार 603 रुग्ण
- 9 जुलै 2020 - 6 हजार 875 रुग्ण
- 10 जुलै 2020 - 7 हजार 862 रुग्ण
- 11 जुलै 2020 - 8 हजार 139 रुग्ण
- 12 जुलै 2020 - 7 हजार 827 रुग्ण
- 13 जुलै 2020 - 6 हजार 497 रुग्ण
- 14 जुलै 2020 - 6 हजार 741 रुग्ण
- 15 जुलै 2020 - 7 हजार 975 रुग्ण
- 16 जुलै 2020 - 8 हजार 614 रुग्ण
- 17 जुलै 2020 - 8 हजार 308 रुग्ण
- 18 जुलै 2020 - 8 हजार 348 रुग्ण
- 19 जुलै 2020 - 9 हजार 518 रुग्ण
- 20 जुलै 2020 - 8 हजार 240 रुग्ण
Leave a comment