बीड । वार्ताहर

  • सोमवारी मध्यरात्रीपासून श्रावण महिन्याला सुरुवात

  • अनेक परंपरा धोक्‍यात

श्रावण महिन्याला अवघ्या काही तासांमध्ये सुरुवात होत आहे. आज रात्री अकरावाजेर्यंत आमावस्या असून, त्यानंतर सोमवारी मध्यरात्रीपासून श्रावण महिना सुरू होत आहे. हिंदू धर्मीयांमधील अत्यंत पवित्र आणि धार्मिक महिना म्हणून ओळख आहे. परंतु करोनामुळे यावर्षी भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येणार नाही. यावर्षी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंदच राहणार असल्याने श्रावण महिन्यात मंदिरात होणारी भाविकांची गर्दी यावर्षी दिसणार नाही.

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण महिनाभर उपवास, धार्मिक कार्यक्रम, कीर्तन सप्ताह, नामसप्ताहासह अनेक कार्यक्रम या महिन्यात आयोजित केले जातात. शहरात असलेल्या शिवमंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात शिवलीला अमृताचे पारायण केले जाते. मात्र यावर्षी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर 23 मार्च रोजी जाहीर झालेल्या लॉकडाऊननंतर अद्यापपर्यंत कोणतीही प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे संपूर्ण शहरातील मंदिरे अद्यापही बंदच आहेत.

बहुतांश मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यावर पत्रे अथवा बांबू आडवे लावून रस्ते व मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या चार महिन्यांपासून काही अटी व शर्तींवर दोन अथवा तीन व्यक्तींच्या किंवा पुजाऱ्यांच्या उपस्थितीत केवळ पूजा व आरती सुरू आहे. संपूर्ण श्रावण महिन्यातही याच धर्तीवर पूजा होणार आहे. श्रावण महिन्यात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिरे उघडण्यास परवानगी मिळण्याची शक्‍यता धुसर असल्याने यावर्षी मंदिरातील मूर्तींच्या दर्शनाविनाच भाविकांना घरीच उपासना करणे भाग पडणार आहे.

 

परंपरा सुरू राहणार का? 

अनेक वर्षांपासून काही मंदिरांमध्ये श्रावण महिन्यात विविध पूजा, धार्मिक कार्यक्रम, सप्ताह साजरे होतात. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून या पूजा करण्यास परवानगी दिली जाणार का? याबाबत अद्याप प्रशासनाकडून कोणतेच उत्तर आलेले नाही. मात्र परंपरागत धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी, यासाठी देवस्थान ट्रस्ट प्रयत्नशील आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी अथवा महापालिका आयुक्त काय निर्णय घेतात यावरच परंपरा सुरू राहणार का? या प्रश्‍नाचे उत्तर मिळणार आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.