खरीप पिकांचा विमा उतरविण्याची अंतीम तारीख 31 जुलै 2020
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2020 सहभागी होणार्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन
बीड । वार्ताहर
जिल्हाासाठी सन 2020-21 खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागु करण्यात आली असून पुढील तीन वर्षांसाठी (2020-21 ते 2022-23) खरीप व रब्बी हंगामासाठी भारतीय कृषि विमा कंपनी
अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित पिकासाठी काम करणार आहे.
या योजनेमुळे बीड जिल्ह्यातील खरीप हंगामातील 10 पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. ही योजना या वर्षापासुन कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. खरीप पिकांचा विमा उतरविण्याची अंतीम तारीख 31 जुलै 2020 अशी आहे. सदर योजनेस मुदतवाढ मिळणार नाही याची सर्व शेतक-यांनी नोंद घ्यावी. शेतक-यांना प्रतिकुल हवामान घटकामुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पिक पेरणी पासुन काढणी पर्यंतच्या कालवधीत पिकांच्या उत्पन्नात घट, काटणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती इत्यादी बाबी करीता विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतक-यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणुन गाव पातळीवर अधिकची सुविधा म्हणुन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राव्दारे/ महा-ई-सेवा केंद्राव्दारे सदर योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी पिक विमा भरण्यासाठी शक्यतो बँकेत जाणे टाळावे.
पिक विमा संबंधित अनुक्रमे पिक /सन 2020-21 खरीप हंगामासाठी
संरक्षित रक्कम (रु.प्रति हे.)/ शेतकरी विमा हप्तारक्कम (रु. प्रति हे.) पुढील प्रमाणे आहे
1खरीप ज्वारी 25000/ 500/
2 बाजरी 22000/ 440/
3 मका 30000/ 600/
4 तुर 35000/ 700/
5 मुग 20000/ 400/
6 उडीद 20000/ 400/
7 भुईमुग 35000/ 700/
8 सोयाबीन 45000/ 900/
9 कापुस 45000/ 2250/
10 कांदा 65000/ 3250/
पिक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. आधार कार्ड, 2. बैंक पासबुकची पहिल्या पानाची स्पष्ट झेरॉक्स, 3. जमिनीचा 7/12 उतारा 4. स्वयंघोषित पेरणी प्रमाणपत्र, 5. जर कुळासाठी लाभ घ्यावयाचा असेल तर भाडेपट्टी करार असलेला शेतक-याचा करारनामा.
• सदरील योजना ऐच्छिक असल्याने कर्जदार शेतक-यांनी कर्जाच्या रक्कमेतुन विमा हप्ता बजा होऊ दयावयाचा नसेल तर 23 जुले पुर्वी आपल्याला कर्ज दिलेल्या बँकेस तशा स्वरुपाचे लेखी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
• शेतक-यांनी विमा हप्ता रक्कमे व्यतीरीक्त कोणतीही जादाची रक्कम संबंधीत महा-ई-सेवा केंद्र/ ग्राहक सेवा केंद्र यांना देण्यात येऊ नये.
• पिक विमा भरल्यानंतर विम्याची पावती आवश्य घ्यावी. त्यावरील भरलेली रक्कम, पिक क्षेत्र, पिकाचे
नाव, बैंक खाते क्रं. आय.एफ.सी. कोड व मोबाईल क्रं. इत्यादी बाबी तपासुन घ्याव्यात.
• पिक विमा भरण्यासाठी काही अडचणी उद्भवल्यास संबंधीत विमा कंपनी प्रतिनधी व तालुका कृषि
अधिकारी कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
• सर्व ग्राहक सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशीही 24 तास सुरु राहतील.
त्यामुळे शेतक-यांने लवकर विमा भरण्याची प्रकोया पुर्ण करुन घ्यावी. विमा हप्ता भरण्यासाठी शेतक-यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता विमा भरण्याची प्रकीया पुर्ण करावी. प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र व विमा क्षेत्र या मध्ये तफावत आढळल्यास शेतक-यांना मिळणारी पिक विमा रक्कम कमी असेल त्यामुळे शेतक-यांनी जेवढया क्षेत्रावर पेरणी केलेली आहे तेवढेच क्षेत्र नमुद करावे. चुक होऊ देऊ नये. आणि जर वरील प्रमाणे चुकीची माहिती भरलेली आढळुन आल्यास कदाचीत मंजुर विमा नुकसान भरपाई रक्कम आपल्याला मिळु शकणार नाही प्रशासना कडुन या विषयीची उलट तपासणी होईल. या वर्षी शासकीय विमा कंपनी असल्यामुळे जर गैरप्रकार आढळुन आल्यास संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
• सर्व केंद्र चालकांनी शेतक-यांची गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने टोकण पध्दतींचा वापर करावा.
• शेतक-यांना टोकण देताना शेतक-यांनी विमा हप्ता भरण्यासाठी येण्याची तारीख व वेळ नमुद करावी. तसेच कमी कालावधीत होणारी गर्दी टाळण्यासाठी अतिरिक्त संगणक आणि मनुष्यबळ याची उपलब्धता करावी.
योजनेत सहभागी होऊ इच्छिणा-या शेतक-यांनी अधिकच्या सविस्तर माहितीसाठी विमा कंपनीचे तालुका वरील प्रतिनीधी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, क्षेत्रीय कर्मचारी व सुविधा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांनी केले आहे.
Leave a comment