नवी दिल्ली

 गेल्या 18 महिन्यात 10 कोटी 9 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) पैसे पाठवण्यात आले आहेत. आणखी 4 कोटी 40 लाख लोकांना मदत पाठवण्याचे काम सुरु आहे. केंद्रीय कृषि मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही आहे, त्यांच्या बँक खात्यामध्ये किंवा आधार कार्डावरील नावामध्ये काहीतरी गोंधळ असल्यामुळे ही मदत पोहचू शकली नाही आहे.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारकडून घोषणा करण्यात आली होती की या या योजनेअंतर्गत मिळणारे 2000 रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या काळात पाठवण्यात येतील. आता देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे.

 

तुम्ही देखील स्वत: तपासू शकता की 2 हजार रुपयांचा हप्ता अद्याप तुम्हाला का मिळाला नाही. पीएम शेतकरी सन्मानच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही यासंदर्भातील माहिती तपासू शकता. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये मिळतात.

तीन कागदपत्रे देऊन करा रजिस्ट्रेशन

सरकारने देशातील सर्व 14.5 कोटी शेतकरी कुटुंबाना याचा लाभ मिळावा असे लक्ष्य ठेवले आहे. मात्र अद्याप यासाठीची नोंदणी पूर्ण झालेली नाही. कोणत्याही बालिक व्यक्तीचे ना रेवेन्यू रेकॉर्डमध्ये आहे तो या योजनेचा फायदा घेऊन त्याची शेती सुधारू शकतो. याचा अर्थ असा की एकाच शेतीयोग्य जमिनीच्या भूमी अभिलेख पत्रावर एकापेक्षा जास्त प्रौढ सदस्यांची नाव असतील, तर योजनेअंतर्गत त्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीला योजनेचा वेगवेगळा लाभ मिळेल. याकरता आधार कार्ड आणि बँक खाते नंबर देखील आवश्यक आहे. य़

थेट मंत्रालयामध्ये करा संपर्क

-या योजनेसाठी सरकारने एक हेल्पलाइन क्रमांक बनवला आहे. ज्याअंतर्गत तुम्ही थेट कृषी मंत्रालयाशी संपर्क करू शकता

 

-PM-KISAN हेल्पलाइन नंबर 011-24300606

-पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266

-पीएम किसान हेल्पलाइन नंबर:155261

-पीएम किसान लँडलाइन नंबर्स: 011-23381092, 23382401

पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे : 0120-6025109

ई-मेल आयडी: [email protected]

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.