मुंबई । वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे (Maharashtra state board) बोर्डाचे बारावीचे निकाल उद्या म्हणजे 16 जुलैला जाहीर होणार आहेत. दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर mahresult.nic.in यावर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होईल.
Coronavirus च्या संसर्गामुळे महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा पूर्ण होऊ शकली नव्हती. पण बारावीचे मात्र सगळे पेपर साथीच्या प्रादुर्भावाअगोदर आणि लॉकडाऊनपूर्वीच झाले होते. उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता निकाल कधी लागेल याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष होतं.
मिळालेल्या माहितीनुसार बोर्डाने बारावीच्या परीक्षेचे निकाल गुरुवारी दुपारी 1 वाजता जाहीर करायचं ठरवलं आहे. हे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी खालील तीन पैकी कोणत्याही
एका वेबसाईट चा वापर विद्यार्थ्यांनी करावा
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
विद्यार्थ्यांना वरील संकेतस्थळांवरून निकाल पाहता येईल आणि निकालाची प्रिंट आऊटही घेता येईल.
या वर्षी इयत्ता बारावीच्या 13 लाखहून अधिक तर दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीचे निकाल उद्या तर दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती मिळत आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.
यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत. आता या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनरमूल्यांकनसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता ही प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू केली जाईल.
Leave a comment