मुंबई -

बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना शनिवारी रात्री मुंबईतल्या नानावटी हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  दवाखाण्यात दाखल होताच डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या काही चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यांना कोरोना झाल्याची माहिती त्यांनीच ट्विटरवर दिली आहे.

काय म्हटलं आहे अमिताभ बच्चन यांनी?

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे. या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

करोनाची लागण आता महानायक अमिताभ बच्चन यांनाही झाली आहे. अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याचवेळी त्यांना करोनाची लागण झाल्याची चर्चा होती. मात्र सुरुवातीला बच्चन कुटुंबीयांकडून प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली नाही. आता अमिताभ बच्चन यांनी स्वतःच ट्विट करुन ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट केलं आहे.

कुटुंब आणि स्टाफ क्वॉरंटाईन

अमिताभ बच्चन यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या घरातील स्टाफचा कोरोना चाचणी करण्यात आलीय. सर्वांनी स्वतःला क्वॉरंटाईन करुन घेतले आहे. कुटुंबातील सदस्य आणि स्टाफचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

अमिताभ बच्चन लवकरचं रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहे. याअगोदर बिग बी अखेरीस गुलाबो-सिताबो या चित्रपटात पाहायला मिळाले होते. या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. गुलाबो-सिताबो ओटीटी प्लेटफॉर्म रिलीज झाला होता. अमिताभ बच्चन सध्या त्यांचा प्रसिद्ध टिव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' च्या 12 भागाची तयारी करत होते.

रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण; बंगला केला सील

अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण झाली आहे. सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच मुंबई महानगरपालिकेने रेखा यांचा मुंबईतील बंगला सील केला आहे. त्याचसोबत त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोन असल्याचा फलकही लावण्यात आला आहे.

वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, बंगल्यात दोन सुरक्षारक्षक असतात. त्यापैकी एकाला करोनाची लागण झाली आहे. संबंधित सुरक्षारक्षकावर उपचार सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसराला सॅनिटाइज केलं आहे. याप्रकरणी रेखा किंवा त्यांच्या प्रवक्त्याकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.