कानपूर :-
कुख्यात गुंड विकास दुबे कानपूर पोलिसांकडून एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याची ताजी माहिती समोर येत आहे. काल विकास दुबेला अटक करण्यात आली होती. आज सकाळी उत्तर प्रदेशची स्पेशल फोर्स टीम त्यांना मध्य प्रदेशच्या उजैवमधून कानपूर येथे आणत असताना गाडीचा अपघात झाला. या दरम्यान, विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि दुबेमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. त्यात तो मारला गेल्याची माहिती सांगितली जात आहे.
काय आहे घटनाक्रम
कुख्यात गुंड विकास दुबे याला काल कानपूर पोलिसांनी अटक केली होती. आज पहाटे त्याला मध्य प्रदेशमधील उजैन येथून कानपूर आणले जात होते. यावेळी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सची विकास दुबेला आणत होती. दरम्यान, भौती गावात पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. गाडी पलटली. या प्रसंगाचा फायदा घेत विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांचीच बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांनीही त्याला थांबवण्यासाठी गोळीबार सुरू केला. त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र तो गोळ्या झाडत राहिला. या चकमकीत पोलिसांकडून विकास दुबे मारला गेला. विकास दुबेच्या छातीवर गोळ्या लागल्या. तर पोलिसांचेही दोन जवान जखमी झाले आहेत. गंभीर अवस्थेत कानपूरच्या हॅलेट रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये पोलीस पथकावर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात उपअधीक्षकासह आठ पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यास गेले असता ही चकमक उडाली होती. तेव्हापासूनच पोलीस विकास दुबेचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्यावर पाच लाखांचे बक्षिसही जाहीर केले होते. अखेर काल मध्य प्रदेशच्या उजैनमधील एका मंदिरातून त्याला अटक करण्यात आली होती. गोळीबारात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांकडून विकासला ठार मारण्याची मागणी होत होती. त्याला ताब्यात घेऊन वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्या कुटुंबियांकडून प्रतिक्रिया येत होती. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी त्याचा राईट हँड समजला जाणारा अमर दुबे याचाही एन्काउंटर कानपूर पोलिसांनी केला होता.
विकास दुबे हत्याकांड; काल 'या' व्यक्तीनं केली एन्काऊंन्टरची मागणी, आज झाली सत्य घटना.
आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असणारा कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. मात्र विकास आणि त्याला साथ देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा एन्काऊंटर केले पाहिजेत, अशी मागणी शहीद झालेल्या जितेंद्र कुमार यांचे भाऊ झहेंद्र पाल यांनी केली होती.
उत्तर प्रदेशात कर्फ्यू असतानाही विकास दुबे मध्य प्रदेशात पोहचलाच कसा असा सवालही जितेंद्र यांनी उपस्थित केला आहे. एवढंच नव्हे तर दुबेवर राजकीय वरदहस्त असल्याचाही आरोप जितेंद्र यांनी लगावला आहे.
गुरूवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्याला उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांकडे सोपवलं. अधिक चौकशीसाठी त्याला उज्जैनवरून कानपूरला घेऊन जाण्याचा प्लॅन ठरला.
त्यानुसार त्याला कानपूरला नेत असताना पहाटे पहाटे एका गाडीला अपघात झाला. अपघातानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी यावेळी त्याला सोडलं नाही. जनतेकडूनही विकासचा एन्काऊंटर करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती.
पोलिसांच्या ताफ्यापाठोपाठ माध्यम प्रतिनिधींच्या गाड्यादेखील होत्या. मात्र त्यांच्या गाड्या रस्त्यावर अचानक थांबवण्यात आल्या....
कानपूर: आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. आज सकाळी विकासला कानपूरला नेलं जातं होतं. त्यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका कारला अपघात झाला. विकास दुबे याच कारमध्ये होता. कार उलटताच त्यानं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला.
विकास दुबेच्या एन्काऊंटरच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी घडलेल्या घडामोडी संशयास्पद आहेत. कानपूरच्या भौती भागात रस्त्याशेजारी विकासचा एन्काऊंटर झाला. विकासनं पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र पोलिसांनी केलेल्या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. विकास दुबेला उज्जैनहून कानपूरला आणलं जात असताना पोलिसांच्या ताफ्यापाठोपाठ माध्यम प्रतिनिधींच्या गाड्यादेखील होत्या. मात्र त्यांच्या गाड्या रस्त्यावर अचानक थांबवण्यात आल्या. विशेष म्हणजे गाड्या रोखण्यात आलेल्या भागापासून पुढे काही अंतरावर विकासचा एन्काऊंटर झाला.
Leave a comment