नवी दिल्ली :

 कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी देशात लस बनवली जात आहे. पुढील आठवड्यात या नव्या लसीची क्लिनिकल चाचणी होणार आहे. यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला ही पहिली लस दिली जाणार आहे, त्या व्यक्तीची निवड देखील करण्यात आली आहे. 

 या तरूणाला दिली जाणार देशातील पहिली कोरोनाची लस

माणसांवर या लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे, यात चिरंजीत धीबरचं नाव पुढे आलं आहे. चिरंजीत धीबर हे एक शिक्षक आहेत. पुढील आठवड्यात त्यांच्यावर क्लिनिकल ट्रायल होणार आहे, त्यासाठी त्यांना आयसीएमआरच्या भुवनेश्वर केंद्राला जावं लागेल.

चिरंजीत धीबर यांनी आपल्या फेसबूकवर या विषयी माहिती देताना म्हटलं आहे, संघाच्या प्रेरणेमुळे मी कोरोना व्हायरससाठी क्लिनिकल ट्रायलसाठी, माझं शरीर देशाला दान केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिरंजीत धीबर यांनी  एप्रिल महिन्यातच क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी अर्ज दिला होता.

जाणकारांच्या मते चिरजीत धीवर हे बंगालच्या दुर्गापूरमध्ये शिक्षक आहेत. आरएसएसच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या महासंघाच्या कार्यकारिणीत सदस्य आहेत.

आपल्या देशाची औषध निर्मिती करणारी कंपनी भारत बायोटेक ने आयसीएमआरसोबत मिळून कोरोना व्हायरसची लस बनवली आहे. या लसीची माणसांवर चाचणी या महिन्यात होणार आहे, देशातील १२ केंद्रांवर या लसीची क्लिनिकल ट्रायल होणार आहे. 

सरकारकडून १५ ऑगस्टपर्यंत ही लस लॉन्च करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण ही लस भारतात कधी लॉन्च केली जाईल, सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल याला किती उशीर होईल किंवा लवकर येईल, यावर वेगवेगळी मतं आहेत.

सरकारकडून १५ ऑगस्टपर्यंत ही लस लॉन्च करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण ही लस भारतात कधी लॉन्च केली जाईल, सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल याला किती उशीर होईल किंवा लवकर येईल, यावर वेगवेगळी मतं आहेत.

मास्क, सॅनिटायझरला अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले

 

जगात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत देशात २२ हजार ७५२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४२ हजार ४१७ वर पोहोचली आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असताना दुसरीकडे या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या मास्क आणि सॅनिटायझरला अत्यावश्यक सेवेतून वगळण्यात आले आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा देशभरात उपलब्ध असल्याचे कारण देत या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याचे आदेश केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता यांच्या किंमतीवरही कोणतेही नियंत्रण यापुढे असणार नाही. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

किंमती वाढण्याची शक्यता

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटाझरचा वापर करणे गरजेचे असताना सध्याच्या परिस्थितीत ते अत्यावश्यक वस्तूंमधून वगळल्याने पुन्हा किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाला आरोग्यक्षेत्रातून विरोध देखील केला जात आहे.

एकीकडे कोरोना विषाणूच्या साथीचा उद्रेक सुरू असताना अत्यावश्यक यादीतून या गोष्टी वगळण्याची घाई करणे. न्यायालयामध्ये यावर सुनावणी सुरू असताना अचानक निर्णय घेणे. या बाबी शंकास्पद आहेत. यामुळे पुन्हा किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.  – डॉ. दीपक बैद; मेडिकल कन्सल्टंटस असोसिएशनचे अध्यक्ष

दोन्ही वस्तूंचा मुबलक साठा उपलब्ध

देशभरात दोन्ही वस्तूंचा साठा उपलब्ध आहे. तसेच यांच्या किंमतीही नियंत्रणाखाली असल्याने आता या वस्तूंना अत्यावश्यक सेवेमध्ये नमूद करणे गरजेचे नसल्याचे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे १ जुलैपासून हा नियम लागू झाल्याने अत्यावश्यक वस्तूसेवा कायदा १९५५ अंतर्गत या वस्तूचे निश्चित केलेले दरही आता लागू नाहीत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.