मोदींच्या लेह दौऱ्यावरुन काँग्रेसचा निशाणा, इंदिरा गांधींचा फोटो शेअर केला अन्...
नवी दिल्ली :
भारतीय भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात भारतीय सैन्यावर पाठीमागून हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले. यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज थेट लेह गाठत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. मोदींच्या या लेह दौऱ्यावरुन काँग्रेसने निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी माजी पंतप्रधान आणि दिवंगत नेत्या इंदिरा गांधी यांचा फोटो शेअर केला आहे.
भारत-चीन सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख नरवणे यांच्यानंतर सीडीएस बिपिन रावत लेह-लडाखच्या दौऱ्यावर जाणार होते. तेथे ते एलएसीवरील सुरक्षेचा आढावा घेणार होते. मात्र, मोदी यांनी अचानक भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत बिपिन रावतदेखील असून त्यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले. मोदींकडून चीनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची भेट घेऊन विचारपूस करण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावरुन काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले आहे. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी इंदिरा गांधीचा फोटो शेअर करुन, आता पाहुयात मोदी काय करतात? असा प्रश्न विचारला आहे.
मनिष तिवारी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये इंदिरा गांधी देशातील जवानांना संबोधित करताना दिसत आहेत. या फोटोसोबत मनिष तिवारी यांनी लिहिले आहे की, जेव्हा इंदिरा गांधी लेह भेटीला गेल्या होत्या, त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. आता, पाहुयात मोदीजी काय करतात? असा खोचक टोला काँग्रसने लगावला आहे. इंदिरा गांधींचा हा फोटो 1971 च्या युद्धापूर्वीचा असून त्यांनी लेह येथे देशाच्या सैन्याला संबोधित केले होते.
दरम्यान, मोदींनी लडाखमधील निमूमध्ये अचानक दिलेल्या भेटीनंतर आयटीबीपी, हवाई दलाच्या जवानांसोबत चर्चा केली. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 11,000 फुटांच्या उंचीवर आहे. सिंधू नदीच्या काठावर भारतीय जवानांचा कँप आहे. मोदी चीनवर एकानंतर एक वार करत आहेत. भारताच्या सरकारी कंपन्यांना ४जी कंत्राटे रद्द करण्याचे आदेश, रेल्वेला चीनच्या कंपनीसोबतचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले होते. यानंतर 69 अॅपवर बंदी आणली होती. तसेच बुधवारी रशियाकडून तातडीने 33 लढाऊ विमाने मिळविण्यासाठी चर्चाही केली होती.
पंतप्रधान मोदी घेणार दिल्लीत बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता
भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह-लडाखला पोहचले. सीमेजवळील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मोदी लडाखला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतही उपस्थित आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी आपला लेह दौरा आटोपून दिल्लीत येतील. त्यानंतर पंतप्रधान संरक्षण मंत्री, मंत्रिमंडळ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत बैठक करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपली भेट स्थगित केल्याच्या दुसर्याच दिवसाशी पंतप्रधान मोदींनी अचानक सीमेवर भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या निमूमधील अग्रेषित ठिकाणी आहेत. मोदी पहाटे येथे तिथे पोहोचले. मोदी आज सैन्य, हवाई दल आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह मधील रुग्णालयात जाणार आहे. जखमी सैनिकांची करणार विचारपूरही करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मोदी सध्या उपस्थित असलेले हे ठिकाण 11 हजार फूट अंतरावर, झांस्करच्या रांगेने वेढलेले आणि सिंधूच्या किनाऱ्याभोवती असणाऱ्या कठीण भूभागांपैकी हे एक आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्पस कमांडर-स्तरीय तीन बैठका झाल्या यावेळी चर्चेनंतर गलवान खोऱ्या जवळील LAC मधील काही भागांतून आपले सैन्य मागे घेण्याचे चीनने मान्य केले होते. आता चीन सैन्य मागे घेणार का? या प्रतीक्षेत सरकार आहे. या बैठका 6 जून, 22 जून आणि 30 जून रोजी पार पडल्या.
Leave a comment