औरंगाबाद । वार्ताहर
मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 12 वर्षीय मुलाचा मृतदेह आज सकाळी हर्सूल परिसरातील पाण्याने भरलेल्या विहिरीत तरंगताना आढळून आला. कृष्णा रामू मकळे (वय:12 , रा . अंबरहिल ,जटवाडा रोड, औरंगाबाद ) असे मृत मुलाचे नाव आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी कृष्णा दुपारी बहिणीसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर घरातून निघून गेला होता . दिवसभर तो घरी परतला नाही. यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. मात्र तो सापडला नाही. यामुळे त्याची आई नंदा मकळे यांनी अपहरण केल्याची तक्रार हर्सूल ठाण्यात दिली. पोलीस त्याचा शोध घेत असताना आज सकाळी हर्सूल परिसरातील वीटभट्टी जवळील एका शेतातील विहिरीत कृष्णाचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. यानंतर त्याला बेशुद्धावस्थेत विहिरीतून काढून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले . तेथील डॉक्टरांनी कृष्णाला तपासून मृत घोषित केले. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Leave a comment