नवी दिल्ली :
केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी स्पष्ट केले की कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदा भारतीय नागरिकांना हज यात्रेसाठी न पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नकवी यांनी पत्रकारांनी बोलताना सांगितले की, काल रात्री साऊदी अरब सरकारच्या हज मंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी जगात पसरलेल्या कोरोना महामारीबाबत चर्चा केली. त्यानंतर असे ठरविण्यात आले की हज २०२० साठी यंदा भारतातून कोणत्याही यात्रींना पाठविण्यात येणार नाही.
त्यांनी सांगितले की, आम्ही साऊदी अरेबियाच्या निर्णयाचा सन्मान करत हा निर्णय घेतला आहे. यंदा भारतीयांना हज यात्रेला पाठविण्यात येणार नाही. यावेळी निवडण्यात आलेल्या २ लाख ३० हजार नागरिकांना त्यांचे पैसे परत केले जातील. हजला जाण्यासाठी यात्रेकरूंकडून पैसे घेतले जातात. त्यांना हज यात्रेसाठी संबंधित राज्याकडून अनुदान दिले जाते. पण यंदा हज यात्रा भारतीयांसाठी केली जाणार नसल्याने हज यात्रेसाठी भरलेले पैसे पुन्हा यात्रेकरूंना परत दिले जातील.
भारतीय हज कमिटीने काही दिवासांपूर्वी एक परिपत्रक काढून सांगितले होते की ज्या व्यक्तींचे हज २०२० साठी निवड झाली आहे. आणि त्यातील काही जणांना जायचे नसेल तर त्यांनी आपले पैसे परत घेऊन जाऊ शकते. आता भारताने हा निर्णय घेतल्यानंतर सर्व हजला जाणाऱ्या इच्छूकांचे पैसे परत केले जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या केसेस साऊदी अरेबियात वाढत आहेत. तरीही अजून तेथील सरकारने निर्णय घेतलेला नाही की दुसऱ्या देशांसाठी हज यात्रा होणार की नाही. पण आताच मिळालेल्या माहितीनुसार तेथील सरकारने हज होणार असून तो मर्यादित स्वरुपाचा असणार आहे.
Leave a comment