तेलंगणा :
पूर्व लडाखच्या गलवान घाटीमध्ये झालेल्या हिंसक झडपेत शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नीची डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलंय. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी त्यांना सुर्यपेट जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर पद देऊन सन्मानित केलंय. १५ जून रोजी चीनी सैनिकांसोबत झालेल्या झडपेत कर्नल संतोष बाबू यांच्यासहीत २० जण शहीद झाले होते.
कर्नल बाबू हे १६ बिहार रेजीमेंटचे कमांडींग ऑफीसर (सीओ) होते. तेलंगणाच्या सुर्यपेट येथे ते राहत होते. कर्नल बाबू यांच्या पत्नीला सरकारी नोकरी, घरच्या उदरनिर्वाहासाठी ५ कोटी रुपये आणि जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव स्वत: त्यांच्या घरी जाऊन नियुक्ती पत्र, ५ कोटींचा चेक सोपवणार आहेत.
काही तासांसाठी झालेल्या संघर्षामध्ये पाण्यात बुडण्यामुळं, अतीथंडीमुळं जवानांना बऱ्याच जखमा झाल्याचं उघडल झालं आहे. लेहमधील सोनम नरबू मेमोरियल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका ड़ॉक्टरांनी गोपनीयतेच्या अटीवर इंडियन एक्सप्रेसला महत्त्वाची माहिती दिली. शहीद जवानांचे मृतदेह पाहता त्यावरील जखमा संघर्ष किती मोठा आणि हिंसक स्वरुपाचा होता याची प्रचिती देतात असं सांगितलं. धारदार शस्त्राचे वार आणि बरगड्यांना लागलेला मार पाहता बहुतांश जवानांची हीच परिस्थिती पाहायला मिळाल्याचंही त्यांनी उघड केलं.
चिनी सैनिकांचे हे वार झेलत भारतीय सैनिकांनी त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं हेसुद्धा अधोरेखित करण्याजोगं. भारतीय सैन्यातील कमांडींग ऑफिसर कर्न संतोष बाबू यांच्यावर हल्ला केल्यानंतर भारतील जवानांनी चीनच्या तुकडीवर सबळ हल्ला चढवला अशी माहिती एका जखमी भारतीय जवानानं दिली होती.
तीन्ही दल सज्ज
फक्त लष्करच नव्हे, तर ऩौदल आणि वायुदलालाही या परिस्थितीमध्ये सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असाधारण स्थितीत बंदुका वापरण्याचे आदेश देण्यासोबतच सैन्याच्या तिन्ही तुकड्यांच्या सुसज्जतेचा आढावाही घेण्यात आला. इतकंच नव्हे तर चीनसोबतच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये आता हवाई दलालाही महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. हे देश म्हणजे सुट्ट्या रद्द करण्याचे. सद्यस्थितीला परिस्थितीची गरज पाहता हवाई दलातील जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
अखेर लडाख संघर्षात आपले सैनिक मारले गेल्याची चीनकडून कबुली, म्हणाले…
पूर्व लडाखमध्ये भारतीय सैनिकांसोबत झालेल्या चकमकीनंतर पहिल्यांदाच चीनने आपले सैनिक ठार झाल्याचं मान्य केलं आहे. चीनने आपले २० पेक्षा कमी सैनिक मारले गेले असल्याचं सांगितलं आहे. आयएएनएसने यासंबंधी वृत्त दिलं आहे. भारतीय जवानांनी चकमकीत ठार झालेल्या १६ जवानांचे मृतदेह चीनकडे सोपवले असल्याचं वृत्त आल्यानंतर चीनने ही कबुली दिली आहे.
लडाखमध्ये झालेल्या चकमकीत २० जवान शहीद झाल्याचं भारताने जाहीर केल्यानंतरही चीन मात्र शांत होतं. आपल्या जखमी किंवा ठार झालेल्या जवानांची कोणतीही माहिती चीनकडून देण्यात आली नव्हती. पण पहिल्यांदाच चीनकडून अधिकृतपणे जवान ठार झाल्याचं मान्य करण्यात आलं आहे.
याआधी ग्लोबल टाइम्सने ‘चिनी तज्ञ’ या लेखात तणाव वाढू नये यासाठी चीन लडाखमधील जखमी तसंच ठार जवानांची आकडेवारी जाहीर करत नसल्याचं सांगितलं होतं. जर चीनने २० पेक्षा कमी जवानांचा आकडा जाहीर केला तर भारतीय सरकार पुन्हा दबावात येईल असं ट्विट ग्लोबल टाइम्सकडून करण्यात आलं होतं.
चीनमधील काही विश्लेषक आणि निरीक्षकांनी भारतीय अधिकारी भारतीयांना दिलासा देण्यासाठी चीनमधील जखमी तसंच ठार जवानांची आकडेवारी भारतापेक्षाही जास्त असल्याचं सांगत असल्याचा आरोप केला होता. ग्लोबल टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांचाही उल्लेख केला आहे. व्ही के सिंग यांनी शनिवारी चीनचे ४० हून अधिक जवान ठार झाल्याचं म्हटलं आहे.
Leave a comment