बीड । वार्ताहर
तब्बल 25 वर्षांनंतर यंदाचे सर्वात मोठे सूर्यग्रहण देशभरातील खगोलशास्त्रज्ञासह नागरिकांना पाहण्याची संधी मिळाली. या काळात सूर्य अंगठीसारखे दिसले. तर काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यास मिळाले. याआधी 1995 मध्ये अशाप्रकारचे ग्रहण पहायला मिळाले होते.
आजचे सूर्यग्रहण सकाळी 9.15 मिनिटांनी सुरू झाले असून दुपारी 3 वाजता ते संपणार आहे. आजचे सूर्यग्रहण भारतात काही भागात कंकणाकृती तर उर्वरित भारतात ते खंडग्रास ग्रहणासारखे दिसले. सूर्यग्रहणादरम्यान बीडचे छायाचित्रकार आजिनाथ बडगे यांनी बीड शहरातील तुळजाई चौकातून सूर्यग्रहणादरम्यानच्या विविध छटा आपल्या कॅमेर्यात कैद केल्या आहेत. बीडमध्ये सूर्यग्रहण नेमके कसे दिसले हे खास लोकप्रश्नच्या वाचकांसाठी देत आहोत.पहा फोटो गॅलरी.....
Leave a comment