काँग्रेसला धक्का; मध्य प्रदेशात भाजपची सरशी, राजस्थानातले निकालही लागले
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे
गुजरातच्या निकालांकडे देशाचं लक्ष
नवी दिल्ली
राज्यसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या निकालांकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. त्यापैकी मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का बसल्याचं दिसतं. राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला किमान दोन जागा मिळतील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात काँग्रेसला एकच जागा मिळवता आली आहे. भाजपने मात्र दोन जागा खिशात घातल्या आहेत. राजस्थानात मात्र तीन पैकी दोन जागा काँग्रेसने मिळवल्या आहेत, तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.
मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह यांनी भाजपचा गड राखला आहे. काँग्रेसच्या केवळ दिग्विजय सिंह यांचाच विजय झाला आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया 56
दिग्विजय सिंह 57
सुमेर सिंह 55
राजस्थानात काँग्रेस उमेदवार वेणुगोपाल आणि नीरज डांगे जिंकले आहेत. भाजपच्या राजेंद्र गहलोत यांनी विजय मिळवला आहे. पण ओंकारसिंह लखावत यांना हार पत्करावी लागली.
आंध्र प्रदेशातल्या चारही जागा YRS काँग्रेसनी जिंकल्या आहेत.
देशातल्या 7 राज्यातल्या एकूण 19 जागांसाठी मतदान झालं. त्याचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत 15 जागांचे निकाल हाती आले आहेत. ईशान्येकडच्या राज्यात भाजपची सरशी झाली आहे. 24 जागांंसाठी निवडणूक होणार होती. पण कर्नाटकच्या चार जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्याने मतदान झालं नाही.
राज्यसभेसाठी मतदान झालेली राज्य आणि जागा
आन्ध्रप्रदेश 04
मध्य प्रदेश 03
राजस्थान 03
गुजरात 04
झारखंड 02
मिजोरम 01
मणिपुर 01
मेघालय 01
भाजपचं लक्ष्य 9 जागा
या निवडणुकीत भाजपला 9 जागांवर विजय मिळवण्याचा विश्वास आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 84 होऊ शकतं. तसंच एनडीए 100 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर बहुमतासाठी एनडीएला केवळ 22 मतांची आवश्यकता असणार आहे. पावसाळी अधिवेशनात AIADMK, YSRCP, DMK आणि TRS सारखे पक्ष भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे.
Leave a comment