मुंबई : 

 

शिवसेनेसोबत राजकारणाचा प्रयत्न झाला तो मोडीत काढण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे, परंतु भविष्यात शिवसैनिकला पंतप्रधानही बनवणार, असा निर्धारही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचा आज 34 वा वर्धापन दिवस आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर हा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

पुढे ते म्हणाले, कधीही अन्याय सहन करू नका. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही, असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पुढे ते म्हणाले, आज कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. शिवसेनाच एक वादळ आहे. अशी कितीही वादळे आली तरी हे भगवे वादळ कायम राहणार आहे. शिवसेना हेच एक वादळ आहे, आम्हाला वादळाची परवा नाही.

ज्यावेळी कोरोनाचं संकट आलं तेव्हा कस्तुरबा आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या, त्या आता आपण 100 लॅब केल्या आहेत. आपण लॅब आणखी वाढवणार आहोत. शिवसैनिकांनी देखील ह्या संकटाला रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी स्वतःची काळजी घेऊन दुसऱ्याला मदत करावी, असे आवाहन त्यांनी सर्व शिवसैनिकांना केले. 

मी विचारधारा बदललेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही. आता गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे. स्वत:ची काळजी घेवून लोकांची मदत करा, किती संकटे आली तरी मी डगमगणार नाही. माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे,परंतु शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न आहे असे सांगत मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. वादळामागूनी वादळं आली तरी शिवसेनाच एक वादळ आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आज कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. शिवसेनाच एक वादळ आहे. अशी कितीही वादळे आली तरी हे भगवे वादळ कायम राहणार आहे. शिवसेना हेच  एक वादळ आहे, आम्हाला वादळाची परवा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचं कवच आहे. शिवसैनिकांचे कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे, उद्धव ठाकरे म्हणालेत. 

जे आपल्यासोबत राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, त्या तिडीकीतून मुख्यमंत्री झालो. शिवसेनेवर अन्याय होत असताना शिवसेना कशी गप्प बसेल, मैत्री करून विश्वास ठेवला पण विश्वास ठेवणे, ही आमची कमजोरी नाही. विश्वावसघात करत असेल तर लाचारी स्विकारणार नाही, त्यामुळे हे शिवधनुष्य पेललेले आहे, असा टोला भाजपला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.

'मला पंतप्रधान बनायचे नाही'

मला काही पंतप्रधान बनायचे नाही. मात्र, माझा शिवसैनिक त्या पदावर पोहोचला पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणालेत चीन संकटाबद्दल पंतप्रधान यांनी व्हीसी आयोजित केलीय. देशावर संकट आला तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला आहे. देशावरती चीन नावाच संकट आहे. त्यासाठी संध्याकाळी पाच वाजता माननीय पंतप्रधान यांच्यासोबत मिटींग आहे. हिमालयाच्या संकटाला सुद्धा महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. आपण शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे.  विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. प्राण जाय पर वचन न जाये ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही. शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई कोणाला आंदण म्हणून दिलेली नाही !

मुंबईही रक्त सांडून महाराष्ट्राने मिळवलेली आहे कोणाला आंदण म्हणून दिलेली नाही. म्हणून आपण रक्तदानाचा विश्वविक्रम केला आहे. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक. आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे. शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही.मी शिवनेरीला आणि एकविरेला दर्शनाला गेलो. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आले. शिवनेरीच्या मातीची ही कमाल आहे. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्या सोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी शिवसैनिकांना दिले.

 

 

 

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.