जखमी झालेल्या जवानाने सांगितला गलवान घाटीतला थरार
नवी दिल्ली |
लडाखच्या गलवान घाटीत भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित चकमकीत भारतीय सेनेच्या एका अधिकाऱ्यासह 20 जणांना वीरमरण आलं. या घटनेनं संपुर्ण देशात चीनच्या कुरापती विरोधात संतापाची लाट उसळली. चीनने एकीकडे चर्चेतून मुद्दा सोडवू असं म्हंटल्यानंतर परत एकदा पाठीवर वार केला. चीनच्या वाढत्या कुरापती लक्षात घेता भारतीय जवानही सज्ज झाले. दरम्यान भारतीय जवान आणि चीनी सैनिकांच्या चकमकीत गंभीर जखमी झालेले जवान सुरेंद्र सिंह यांच्यावर लडाखच्या सैनिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तब्बल 12 तासाच्या उपचारानंतर आता ते ठिक आहेत. त्यांनी गॅलन व्हॅलीमधील संपूर्ण घटनेविषयीचा थरार सांगितला. प्रथमच एखाद्या जखमी व्यक्तीने चीनने कसा कट रचला होता हे सांगितले.
नेमकं काय घडलं होतं त्या रात्री?
जवान सुरेंद्रसिंग म्हणाले की, चीनी सैनिकांनी गलवान खोऱ्यातून उगम पावणाऱ्या नदीजवळ भारतीय सैनिकांची फसवणूक केली. या नदीजवळ 1 हजाराहून अधिक चीनी सैनिकांनी 200 ते 250 च्या संख्येत असलेल्या भारतीय सैनिकांना घेरले. चीनी सैनिकांच्या हातात काटेरी तारांनी वेढलेली, तसेच खिळे लावलेली हत्यारे होती. या तीक्ष्ण हत्यारांनी चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर अचानक हल्ला केला. त्यानंतर दोनही सैनिकांमध्ये नदीत सुमारे 4 ते 5 तास रक्तरंजित संघर्ष झाला. यामध्ये 200 ते 250 भारतीय सैनिकांनी चीनच्या 1 हजाहून अधिक सैनिकांचा मुकाबला केला. त्यात अनेक भारतीय जवान गंभीररित्या जखमी झाले. मात्र त्यांनी हार न मानता चीनी सैनिकांशी लढा सुरूच ठेवला. चीनच्या 40 हून अधिक सैनिकांचा भारतीय जवानांनी यावेळी खात्मा केला तर कित्येक जवानांना गंभीररित्या जखमी केले. गलवान घाटीत मोठ्या प्रमाणात थंडी आहे. या थंडीमध्ये नदीच्या थंड पाण्यात हा संघर्ष सुरू होता. ज्याठिकाणी हा संघर्ष सुरू होता. त्या ठिकाणी भारतीय सैनिकांना बाहेर निघण्यास जागा नव्हती अगदी एकाच वेळी एकच सैनिक नदीतून बाहेर निघू शकत होता. अशावेळी चीनी सैनिकांचे लोंढेच लोढें भारतीय जवानांवर तुटून पडत होते. तरीही भारतीय जवानांनी हार न मानता चीनी सैनिकांशी मुकाबला केला.
चार ते पाच तास झालेल्या या चकमकीत भारताचे अनेक जवान जखमी झाले. चीनला सुद्धा यामध्ये मोठे नुकसान झाले. चीनने लपून केलेल्या या हल्ल्यामुळं भारतीय सैनिकांना सावरण्यासाठी वेळ भेटला नाही. अन्यथा भारतीय सैनिकही चिनी सैनिकांना अधिक चांगला धडा शिकवू शकले असते असं जखमी जवान सुरेंद्रसिंग सांगतात. या चकमकीत जवान सुरेंद्रसिंग हे सुद्धा गंभीररित्या जखमी झाले त्यांचा एक हात फॅक्चर झाला. डोक्यात 10 ते 15 टाके पडले आहेत. जखमी झाल्यानंतर ते 5 फूट खोल पाण्यात पडले होते. चीनी सैनिकांनी पळ काढल्यानंतर इतर भारतीय सैनिकांनी गंभीर जखमी झालेल्या आपल्या जवानांना बाहेर काढले. लडाखच्या रुग्णालायात आल्यानंतर सुमारे 12 तासांनंतर सुरेंद्रसिंग यांना जाग आली. या भांडणात सुरेंद्रसिंग यांचा मोबाइल व इतर कागदपत्रेही नदीच्या पाण्यात कोठेतरी पडली.
जाबाज जवान सुरेंद्र सिंह हे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील नौगावा गावचा रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांचं कुटुंब चिंतीत आहे. परंतु लडाखमध्ये इस्पितळात दाखल झालेल्या सुरेंद्रसिंग यांच्याशी फोनवरून कुटुंबातील सदस्यांशी बोलल्यानंतर ते दोघे कुटुंबियांच्या जीवात जीव आला. या घटनेत जखमी झालेले सर्व सैनिक लवकर बरे व्हावे यासाठी त्यांच्या परिवारांकडून प्रार्थना केली जात आहे. जखमी जवान सुरेंद्रसिंग यांची पत्नी अलवर येथील सूर्य नगर नाई बस्ती येथे मुलांसह राहते. जखमी जवानचे आई-वडील व भावाचे कुटुंबीय गावात राहतात.
जवान सुरेंद्र सिंह सांगतात की कोणत्याही देशातील सैनिकांशी सामना करण्यासाठी भारतीय सैनिक सदैव तत्पर असतात. सैनिक सुरेंद्रसिंग यांचे वडील बलवंतसिंग म्हणाले की, बुधवारी दुपारी त्यांचा फोन आला, तेव्हा त्यांच्या मुलाच्या डोक्यात चकमकीत दुखापत झाल्याचे सांगण्यात आले व आता तो पूर्णपणे ठीक आहे. परंतु कुटुंबीय देखील त्याच्या प्रकृतीबद्दल चिंताग्रस्त आहे आणि तेथे जखमी झालेल्या सैनिकांना देवाने लवकर बरे करावे अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
अखेर पुरावा आला समोर; चिनी सैन्याने भारतीय जवानांना मारायला वापरले हे खिळ्यांचे रॉड
चीन- भारत सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात नेहमीच्या चकमकी होतात, तसा गोळीबार झालाच नव्हता, ही बाब आतापर्यंत समोर आलेली आहे. लडाखच्या पर्वतीय प्रदेशात चिनी सैनिकांनी अत्यंत अमानुषपणे भारतीय सैन्यावर हल्ला केला, हे आता समोर आलं आहे. चिनी सैन्याने भारतीय जवानांना मारण्यासाठी वापरलेल्या अणकुचीदार खिळे लावलेल्या रॉडचा फोटो समोर आला आहे.
भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. चिनी सैनिकांनी दगड आणि खिळे ठोकलेले रॉड यांसह भारतीय सैनिकांवर हल्ला केला. अनेक सैनिक जखमी झाले. भारतानेही तीव्र प्रतिकार करत चीनचा हल्ला परतवून लावला. चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. चीनच्या 65 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र चीनच्या बाजूने अद्यापही यावर अधिकृत काही माहिती जाहीर झालेली नाही. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे झालेल्या 5 मे पासून वाद सुरू आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, चिनी कारवायांचा आणखी एक धक्कादायक पुरावा हाती आला आहे. प्रत्यक्ष ताबारेषेच्या LAC चीनकडच्या हद्दीत बुलडोझर आणून हालचाली सुरू होत्या. त्यांनी काही सॅटेलाइट इमेजचा हवाला देऊन वृत्त दिलं आहे की, गलवान नदीचा प्रवाह बदलायचे चिनी सैनिकांचे प्रयत्न सुरू आहेत.
सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ सैन्य मागे घेण्यासंबंधी संवाद आणि हालचाल सुरू असतानाच हा अनपेक्षित हल्ला करण्यात आला. हा चीनने केलेला पूर्वनियोजित हल्ला असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं आहे. यामध्ये गोळीबार नाही तर तुफान दगडफेक आणि रॉडने अमानुष मारहाण करण्यात आली. पर्वतीय प्रदेशात अनेक सैनिकांचा कड्यावरून पडून मृत्यू झाला. जवळपास तीन तास ही धुमश्चक्री सुरू होती.
भारताच्या परराष्ट्र खात्याने दोन देशांच्या लडाखजवळच्या सीमाभागात संघर्ष झाल्याचं निवेदन दिलं होतं. त्यात दोन्ही बाजूंकडचं नुकसान झाल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर भारतीय लष्कराने यात धारातीर्थी पडलेल्या 20 जवानांची नावंसुद्धा जाहीर केली.
Leave a comment