औरंगाबादमध्ये एका दिवसात सत्तर रूग्ण

 

औरंगाबाद । वार्ताहर 

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधील कोरोनाचा संसर्ग असलेल्या रूग्णांचा आकडा वाढतच असून आज दुपारपर्यंत सत्तर रूग्ण आढळून आले, त्यामुळे औरंगाबादचा आकाडा आता तीन हजार एकशे सहा असून तर 166 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान परळी येथील कोरोनाग्रस्त असलेल्या महिला रूग्णावर उपचार चालु असताना औरंगाबादमध्ये मृत्यु झाला आहे. सदरील महिलेला मधूमेह, हायपरटेंशन, न्यूमोनिया, किडनीचा आजार होता. कोरोना असल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेला  उपचारासाठी औरंगाबादला गेल्यावर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दोन दिवसांपूर्वीच केज तालुक्यातील माळेगाव येथीलही एका महिलेलचा औरंगाबादमध्ये कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 

आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील परंतू आष्टी तालुक्यातील पाटण येथे नातेवाईकांकडे आलेली 65 वर्षीय वृद्ध महिला, मातावळी येथील 35 वर्षीय व्यक्ती, केज तालुक्यातील माळेगाव येथील 60 वर्षीय महिला आणि आता परळीच्या महिलेचा समावेश आहे. केजच्या महिलेची अद्याप बीड जिल्हा आरोग्य विभागाकडे नोंद नसल्याचे सांगण्यात आले. एकूण चार महिलांचा कोरोनामुळे बीड जिल्ह्यामध्ये मृत्यू झाला आहे. 

मराठवाड्यात देखील कोरोनाने आपले हातपाय पसरायला चांगलीच सुरुवात केली आहे. मराठवाड्यात  कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, रुग्णांच्या संख्येसोबतच मृतकांचा आकडाही वाढत आहे. बुधवारी औरंगाबादेत चार जणांचा बळी गेला आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा 70 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 3106 वर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान यापैकी 1716 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर 166 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1224 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

मराठवाड्याच्या या जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढतेय

सध्या मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. बुधवारी नांदेड जिल्ह्यात रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे. मात्र जालना आणि औरंगाबादमध्ये रुग्ण वाढ सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल आज पुन्हा नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर चौघांचा बळी गेला आहे. तर जालना जिल्ह्यात नवे 23 रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे जालना जिल्ह्यातील मृतांची संख्या आता 9 झाली आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये देखील कोरोनाचे 3 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या 211 इतकी झाली आहे. लातूर यातील एक रुग्ण लातूर शहरातील भोई गल्ली येथील असून उर्वरीत दोन रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.