सरकारकडून चिनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय

चीनला पहिला दणका; ओप्पो कंपनीला रद्द करावा लागला फोनचा लाँच इव्हेंट

 

 

नवी दिल्ली : 

भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या टिकटॉकसह ५० चिनी ऍपचा वापर न  करण्याचा इशारा भारत सरकार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. चीनचे हे ५० ऍप्स भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. या ऍपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं आहे. यामध्ये Tik-Tok, Helo, UC Browser आणि  Zoom अशा ऍप्सचा समावेश आहे. 

 

शिवाय चीनमधील शॉपिंग ऍप Shien आणि  Xiaomi देखील सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे. Tik-Tok, Helo, UC Browser या ऍप्सचा युझर्स आपल्या मनोरंजनासाठी वापर करतात. परंतु  हे सर्व ऍप्स तुमच्या फोनची लोकेशन आणि महत्त्वाची माहिती हस्तगत करते. शिवाय ऍप्सच्या माध्यमातून हस्तगत केलेली सर्व माहिती चिनी कंपन्यांनी चीन सरकारला पुरवणे बंधनकारक असते.

या माहितीच्या सहाय्याने चिनी गुप्तचर यंत्रणा आणि चिनी सैन्य देशावर हल्ला करण्याची रणनीती आखू शकते अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.  पाश्चिमात्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनाही अनेकदा चिनी कंपनीच्या मालकीच्या ऍप्सच्या वापरासंदर्भातील धोका आणि उघडपणे बोलून दाखवला आहे

सर्वाधिक वापरात येणाऱ्या चिनी ऍप्सची यादी

टिक-टॉक (Tik – Tok) 
हेलो (Helo)
यूसी ब्राउजर (UC Browser)
यूसी न्यूज (UC News)
शेयर इट (Sharit)
लाइकी (Likee)
360 सिक्योरिटी (360 Security)
न्यूज डॉग (NewsDog)
शिन (SHEIN) 
व्हिगो व्हिडियो (Vigo Video)
वी चैट (WeChat)
वीबो (Weibo)
वीबो लाइव (Vibo live)
क्लब फॅक्टरी (Club Factory)

....दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय

 

भारत सरकारने चीनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्सला चिनी उपकरणं हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

तसेच, जुने टेंडर रद्द करुन नवीन टेंडर जारी करा, ज्यात चीनचा सहभाग कुुठेही नसेल अशा प्रकारचे आदेश सरकारी दूरसंचार कंपन्यांना देखील दिले आहेत.

भारत सरकारने दूरसंचार विभाग, बीएसएनएल आणि एमटीएनएलला आदेश देेत सरकारी 4G यंत्रणेत चीनी उपकरणांचा वापर तात्काळ बंद करण्यास सांगितले आहे. दूरसंचार विभागात 4G कार्यान्वीत करण्यास उपयोगात येणारी चीनी उपकरणे जी वापरात आहेत किंवा नाहीत, त्यांचा वापर तात्काळ बंद करावा, असं सरकारने म्हटलेेेेेेेे आहे.

नव्या अटी आणि शर्तींसह सरकारी टेंडरमधून चिनी कंपन्यांना बाहेर ठेवणार असल्याची माहिती आहे. इतर खाजगी मोबाईल कंपन्यांनाही चिनी उपकरणांचा वापर कमी करण्यास सांगण्यात येणार आहे.

चीनला पहिला दणका; ओप्पो कंपनीला रद्द करावा लागला.....

लडाखमध्ये भारत-चीन हिंसाचारात २० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यातच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. याचा मोठा झटका चीनच्या स्मार्टफोन कंपनी ओप्पोला बसला आहे. ओप्पोला भारतातील फोनचा लाइव्ह लाँच इव्हेंट रद्द करावा लागला आहे.

Oppo Find X2 स्मार्टफोन आज संध्याकाळी 4 वाजता एका ऑनलाइन ओन्ली इव्हेंटमध्ये भारतात लाँच केला जाणार होता. या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग युट्युबवरही होणार होते. मात्र, ही युट्युब लिंक गायब झाली आहे. आणि केवळ एक २० मिनिटांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करत Oppo Find X2 फोन लॉन्च केल्याची घोषणा केली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओप्पोने कशाप्रकारे भारतात मदत केली हेदेखील या व्हिडिओमध्ये कंपनीने दाखवले आहे.

दरम्यान, लाइव्ह लाँचिंगऐवजी केवळ व्हिडिओ का अपलोड करण्यात आला. याबाबत वृत्तसंस्था Reutersने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण, त्यावर ओप्पोकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.