अंबाजोगाई । वार्ताहर
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खा.राहुल गांधी यांचा 19 जून रोजी वाढदिवस आहे.वाढदिवसाच्या निमीत्ताने काँग्रेस पक्ष कार्यकर्ते यांनी गरजूंना अन्न पाकिटे वाटप करून मदत करणार असून तसेच कोरोना विषाणू साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर संकटकाळी विविध माध्यमातून मदत व सहकार्य करणा-या कोरोना योद्धा यांचा सन्मान करणार असल्याची माहिती देवून या उपक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते,आजी माजी पदाधिकारी,सर्व सेल, विभाग, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
राजकिशोर मोदी यांनी सांगितले आहे की, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांचा 19 जूनला वाढदिवस आहे.परंतू, सध्या कोरोनामुळे असलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता या वर्षीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. परंतु खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू लोकांना मदत करण्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निश्चित केले आहे.त्यानुसार प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून आणि माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, प्रदेश समन्वय समितीचे मराठवाडा विभागाचे बसवराज पाटील मुरूमकर, जितेंद्र देहाडे यांचे मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील सर्व काँग्रेस आजी माजी पदाधिकारी,विविध सेलचे प्रमुख,तालुका व शहराध्यक्ष आपणांस कळविण्यात येते की,मा.राहुलजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा काँग्रेस कमिटी,ब्लॉक काँग्रेस कमिट्या व फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि सर्व सेल व विभाग यांनी मिळून सामुदायीक स्वयंपाकघरातून अन्नाची पाकिटे बनवून जिल्ह्यातील गरजू लोकांना देण्याची व्यवस्था करावी.तसेच कोवीड 19 साथ रोगाच्या संकटात निस्वार्थीपणे लढा देणारे आरोग्य सेवेतील कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी,पोलीस यंत्रणा व इतर कोरोना योद्धा यांचा यथोचित सन्मान करणारे कार्यक्रम आयोजित करावेत.अशा कार्यक्रमांमध्ये जिल्हा,तालुका व ग्रामपातळीवरील पक्षाचे सर्व पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी यांनी सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
Leave a comment