मुंबई :

 राज्यामध्ये जेव्हा पहिला कोरोना रूग्ण सापडला तेव्हाची आरोग्य व्यवस्था आणि आताची यात जमीन आस्मानचा फरक आहे. यात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. प्रत्येक आरोग्य सुविधा उभारण्यात आणि औषधांच्या वापरात आपण जगाच्या पाठी नाही तर जगाच्या पुढे आहोत. कोविड योद्धांना लढण्यासाठी शस्त्र आणि आयुधं पुरवण्याचे काम आपण करत आहोत. मुंबईत 'चेस द व्हायरस' मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे. आता व्हायरस आपल्या मागे लागता कामा नये, आपण व्हायरसच्या मागे लागायचे आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील फेज 2 आणि ठाण्यातील कोविड रुग्णलाचे इ-लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोनमधली योग्य उपाय योजनांमुळे धारावी आणि मालेगावचा कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यात सरकारला यश आले आहे.

याच पद्धतीने इतर हॉटस्पॉटमध्ये काम करून कोरोना आटोक्यात आणू, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईतील बीकेसी फेज 2 कोविड रुग्णालयामुळे अधिकच्या एक हजार रुग्णखाटा उपलब्ध होतील. यात 108 ICU खाटा तर 20 डायलिसिस आणि 500 ऑक्सिजन खाटांचा समावेश आहे. तसेच ठाण्यातही तब्बल 24 दिवसात कोविड रुग्णालय उभारण्याचा विक्रम केला आहे. या रुग्णालयातही ICU, व्हेंटिलेटर्ससह ऑक्सिजनच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव आणि मुंबई व ठाणे महापालिका आयुक्त उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.