बीड । वार्ताहर
उमरखेड संस्थानचे मठाधिपती प.पु.माधवानंद महाराजांचा 2020 चा चातुर्मास उमरखेड येथे होत आहे. या चातुर्मासामध्ये महाराजांच्या आदेशानुसार सर्व शिष्य बांधवांना काही नियमांचे पालन करण्याचे आवाहन कुलमुखत्यार त्रिंबकराव कुलकर्णी यांनी केले आहे.
त्यानुसार गुरु पौर्णिमेदिवशी कोणीही दर्शनासाठी उमरखेड येथे येवू नये. तसेच सर्वांना व्हाटसअॅपव्दारे दर्शन देण्यात येईल. कोणीही सेवेसाठी उमरखेड येथे येवू नये. त्यांना मठात प्रवेश दिला जाणार नाही. चातुर्मासामध्ये प.पु.माधवानंद महाराजांची पाद्य पूजा व तुला करण्यात येणार नाही. त्यामुळे महाराजांसोबत ब्रह्मवृंदांनी चातुर्मासासाठी येवू नये. घरी बसून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. पुडी धारकाने शक्यतो संकल्पाव्दारे पुडी करावी. चातुर्मासामध्ये महाराजांच्या दर्शनासाठी कोणत्याही शिष्यांनी येवू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
Leave a comment