पालघर

 पालघरमधील गडचिंचले इथं दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकांची जमावाने चोर समजून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी शेकडो नागरिकांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील कोठडीत असलेल्या 11 आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

पालघरमधील गडचिंचले साधू हत्याप्रकरणातील 11 आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे कोरोना चाचणीनंतर पुढे आले आहे. गडचिंचले प्रकरणातील १७ आरोपी न्यायालयीन कोठडीत वाडा पोलीस ठाण्यात अटकेत होते. तीन दिवसांपूर्वी या आरोपींना वाडा पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या आरोपींची कोरोना चाचणी केल्यानंतर 17 पैकी 11 जणांना कोरोना संसर्ग असल्याचे पुढे आले आहे.

 

या कोरोनाबाधित आरोपींना न्यायालयाच्या परवानगीने वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती वाड्याचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.

आरोपीची जंगलात गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. 9 जून रोजी 32 वर्षीय तरुणाने जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. विणश धर्मा धांगडा (रा.दिवशी, चिंचपाडा) असं या तरुणाचं नाव आहे.

याप्रकरणी सीआयडीने 11 मे रोजी विणशचा जबाब नोंदवण्यासाठी चिंचपाडा येथे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला बोलवलं होतं. मात्र, या प्रकरणात विणशचा सहभाग नसल्याचं लक्षात आल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी त्याला सोडून दिलं होतं. परंतु, आता पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागणार या भीतीने विणश यानं जंगलात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला.

 

आरोपी भेटले नाही तर गावातील सर्वांना अटक करू, अशी धमकी पोलिसांकडून वारंवार देण्यात येत असल्याची माहिती विणशच्या पत्नीनं दिली. या प्रकरणी कासा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

( फोटो प्रतिकात्मक )

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.