भारत आणि चीनमध्ये मागील अनेक वर्षांपासून लडाखवरुन वाद सुरु आहे आणि तो आता आणखी चिघळला आहे. गलवान खोऱ्याजवळ सोमवारी (15 जून) रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक चकमक झाली, ज्यात एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना वीरमरण आलं.

मुंबई :

 भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढला आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये चकमक झाली. या चकमकीत भारताचे तीन सैनिक शहीद झाले असून त्यात एक अधिकारी आणि दोन जवानांचा समावेश आहे. 1967 नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये अशी हिंसक चकमक झाली आहे.

भारत आणि चीनमध्ये मागील अनेक वर्षांपासून लडाखवरुन वाद सुरु आहे आणि तो आता आणखी चिघळला आहे. गलवान खोऱ्याजवळ सोमवारी (15 जून) रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक चकमक झाली, ज्यात एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना वीरमरण आलं.

भारतीय लष्कराकडून जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, "गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री डी-एस्क्लेशनच्या प्रक्रियेदरम्यान भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्यातील एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्कर अधिकारी यावेळी या मुद्द्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करत आहेत."

भारत आणि चीनमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच लडाख सीमेजवळ तणावाचं वातावरण आहे. चिनी सैनिक भारताने निश्चित केलेली एलएसी पार करुन पेंगोंग तलाव, गलवान खोऱ्याजवळ पोहोचले होते. चीनने इथे जवळपास पाच हजार सैनिक तैनात केले होते.

दोन्ही देशांच्या सैन्याकडून मोठ्या काळापासून हा वाद संपवण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जात होते 6 जून पासून चर्चेच्या अनेक फेऱ्या सुरु होत्या. यानंतर दोन्ही देशांनी आपापलं सैन्य काही किमीपर्यंत मागे घेतलं होतं. पण ही प्रक्रिया सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.